गोल्डन आय न्यूज नेटवर्क
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचच्या पुरस्कारांची घोषणा !!
रतनलाल सोनग्रा, हनुमंत पपुल यांचा होणार शनिवारी गौरव !!
पुणे : फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे विश्वपारखी संतकबीर व छत्रपती शाहूजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वपारखी संतकबीर पुरस्कार व छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.
विश्वपारखी संतकबीर पुरस्काराने आचार्य रतनलाल सोनग्रा तर छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कराने हनुमंत पपुल यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम शनिवार, दि. 22 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आल आहे.
पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ॲड. आनंद गवळी, लताताई राजगुरू, परशुराम वाडेकर, युवराज बनसोडे, निलेश आल्हाट, यशवंत नडगम, विवेक बनसोडे, इम्रान अन्सारी, कुणाल राजगुरू यांची उपस्थिती असणार आहे.
जाहिरात