गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मराठवाड्यातील तरुण ऋषिकेश मुंडे यांचा पुण्यनगरीतील कलावंत ढोल ताशा पथकात उत्साहाने सहभाग* !!
पुणेः-येथील गणेशोत्सवात सांस्कृतिक दृष्ट्या पारंपरिक ढोल ताशा वादन मध्ये मराठवाड्यातील तरुण कलावंत ऋषिकेश मुंडे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील युवा कलावंत ऋषिकेष यांनी संघर्ष व जिद्द यावर ठाम विश्वास ठेवुन चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असुन पुण्यनगरीतील ‘कलावंत ढोल ताशा पथकात’सहभाग घेऊन गणेशोत्सवात ढोल ताशा ची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भयानक आवाजाच्या प्रदुषणावर मात करुन पारंपारिक दृष्ट्या वाद्यांच्या गजरात खरी संस्कृती जपून ढोल ताशा वादनातून उत्सव साजरा करायला हवा.तसेच गणेश उत्सव भक्ती भावाने साजरा करुन प्रसन्न वातावरण निर्माण करावे.असेही त्यांनी व्यक्त केले.कलावंत ढोल ताशा च्या माध्यमातून उत्साही कलावंत एकत्र येतात व आकर्षक वादनाची सेवा गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत देतांना ताशाच्या तरीचा आवाज झाला की,ख-या अर्थाने मिरवणुकीला सुरुवात होते.
ढोलाचा ढोका,उंच दिमाखात फडकणारा ध्वज आणि एका तालात ऐकू येणारा झांजेचा आवाज वातावरण प्रसन्नमय करुन टाकते.प्रामुख्याने पंधरा जणांनी सुरु केलेल्या व सध्या अडीचशे वादक असलेल्या या “कलावंत ढोल ताशा पथकाचे” हे अकरावे वर्ष आहे.या पथकात कलावंत ऋषिकेश यांनी अन्य कलावंता सोबत उत्साहाने ढोल वादन करुन भाविक जनसमुदायास मंत्रमुग्ध केले.
पुण्याच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आशिर्वादाने सुवर्णसंधी मिळत असल्याबद्दल मराठवाड्यातील या कलावंताचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
__________________________________________
जाहिरात