गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्यावरील ‘जोहड’चे रविवारी प्रकाशन !!
पुणे : जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सामाजिक कार्याविषयीच्या ‘जोहड’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि. 22 सप्टेंबर) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
‘लोकसहभागातून जलसंधारण’ तसेच नदी पुनर्जीवन आणि पर्यावरण अनुकूल शेती करण्याच्या माध्यमातून जनतेच्या, शेतीच्या विकासात डॉ. राजेंद्र सिंह यांचे योगदान अतुलनीय आहे. सुरेखा शाह यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्यावर ‘जोहड’ पुस्तक लिहले आहे. त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद हेमांगिनी जावडेकर-पुराणिक यांनी केला आहे. या इंग्रजीतील अनुवादित ‘जोहड’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता पुण्यातील डेक्कन जिमखाना भागातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सभागृहात होत आहे.
डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे ‘जोहड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत श्रीराम पवार हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असून यशदाचे महासंचालक एम. सुधांशु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यशदाचे अतिरिक्त संचालक शेखर गायकवाड, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तसेच विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर हे ही उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे, असे डॉ. सुमंत पांडे, जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुघ, डॉ. गुरुदास नूलकर, विनोद बोधनकर, शैलजा देशपांडे, डॉ. कैलास बवले, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
__________________________________________
जाहिरात