गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे रविवारी
पंडित सी. आर. व्यास स्मृती संगीत समारोहाचे आयोजन !!
पुणे : पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास स्मृती संगीत समारोहाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. श्याम गुंडावार,
कार्यक्रम रविवार, दि. 23 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पंडित सी. आर. व्यास यांचे शिष्य डॉ. श्याम गुंडावार (पुणे) आणि शोभा चौधरी (इंदोर) यांचे प्रसंगी गायन होणार आहे. पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), पंडित सुभाष कामत (तबला) साथसंगत करणार आहेत.
शोभा चौधरी
पंडित सी. आर. व्यास यांची जन्मशताब्दी आणि पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानच्या शुभारंभानिमित्त या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून या समारोहात पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य पंडित सुहास व्यास यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी डॉ. विकास कशाळकर, पतंजली मादुस्कर, पंडित प्रमोद मराठे, डॉ. राजेंद्र गुंडावर यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती डॉ. श्याम गुंडावार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.
जाहिरात