गोल्डन आय न्युज नेटवर्क
संतनाथबाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भाविकांना श्रीसाई मुर्ती भेट देण्यात आली !!
पुणे -(प्रतिनिधी)-येथील गंगाधाम परिसरातील ‘साई विश्व दरबार’येथे प.पु.सद्गुरु संतनाथबाबा यांच्या प्रथम पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते.या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भाविकांना श्रीसाईबाबांची लहान मुर्ती भेट देण्यात आली.
गंगाधाम परिसरातील गुरुकृपा सोसायटी भागातील “साई विश्वनाथ दरबार’ येथे स्व.संतोषजी रांका उर्फ सद्गुरु श्री संतनाथबाबा यांची प्रथम पुण्यतिथी संपन्न झाली.यानिमित्त सकाळ,संध्याकाळ भजन ,आरतीचेआयोजन करण्यात आले होते.सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.भाविकांनी सद्गुरु संतनाथबाबा यांची प्रतिमा व चरण पादुकाचे दर्शन घेऊनआई माऊली श्रीमती नीताजी रांका यांचे आशिर्वाद घेतले.याप्रसंगी सर्व भाविकांना प्रत्येकी एक श्री साईबाबा यांची लहान मुर्ती भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात अध्यात्मज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांचा शाल,श्रीफळ,वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्व भाविकजनांचे साईराज रांका,प्रणव रांका, सागर भंडारी यांनी स्वागत केले.
संतनाथबाबा यांचा चाहता भाविक वर्ग मोठा असुन बाबांचे मौलिक मार्गदर्शन व हसमुख चेहरा सर्वांच्या आठवणीत असल्यामुळे या पुण्यतिथी कार्यक्रमास प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश येथुन देखील भाविकजन उपस्थित होते.या कार्यक्रमात लवकुश गुप्ता उर्फ एलके,माधव जाधव,नितीन पेटारे,साईल शहा,ईशा पाटोळे,शशिकांत मोरे,जितेंद्र गौड,राजाभाऊ शिंदे,सिध्दार्थ,शुभम,काळे आदी भाविकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
जाहिरात