Marathi FM Radio
Sunday, March 23, 2025

राज्य हौशी संगीत नाट्यस्पर्धेत संगीत आनंदमठ प्रथम दोन रौप्य पदकांसह आठ पारितोषिके पटकाविली !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

राज्य हौशी संगीत नाट्यस्पर्धेत संगीत आनंदमठ प्रथम
दोन रौप्य पदकांसह आठ पारितोषिके पटकाविली !!

पुणे : 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलाज क्रिएशन निर्मित, पुणे निर्मित कल्पक ग्रुप, पुणेने सादर केलेल्या संगीत आनंदमठ या नाटकाने दोन रौप्य पदकांसह आठ पारितोषिके मिळवित पहिला क्रमांक पटकाविला आहे.

Advertisement


इचलकरंजी येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित अंतिम फेरीत 14 नाटकांचे सादरीकरण झाले. ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या, भारतीय अध्यात्म, राष्ट्रभक्ती यांचा अपूर्व संगम असलेल्या आनंदमठ या अजरामर कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ ही नाट्यकृती आहे.

Advertisement

Advertisement

1870 च्या दशकात बिहारपासून आजच्या बांगलादेशपर्यंतच्या भूमीवर संन्याशांनी इंग्रज व बंगालमधील तत्कालीन सत्ताधीशांविरुद्ध केलेल्या सशस्त्र लढ्याचे चित्रण यात आहे. यात नवरसांच्या आविष्कारांसह वीर आणि भक्ती रस केंद्रस्थानी आहेत. ज्येष्ठ लेखिका विनीता तेलंग यांनी आनंदमठ कादंबरीचे नाट्यरूपांतर केले आहे.

Advertisement

Advertisement

युवा रंगकर्मी रवींद्र सातपुते यांनी दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक, संगीतकार अजय पराड यांनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. वंदे मातरम्‌‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस नाटकाचे सूत्रधार आहेत.
वन्दे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समिती आणि वंदे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समिती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे यास सहकार्य लाभले आहे.

45 पेक्षा जास्त कलाकार, तंत्रज्ञ, गायक-वादक यांचा नाटकात सहभाग आहे. जयंत टोले, रवींद्र सातपुते (नेपथ्य), निखिल मारणे (प्रकाश योजना), परितोष ठाकर (पार्श्व संगीत), अरविंद सूर्य (रंगभूषा), गायत्री चक्रदेव (वेशभूषा), महेश धायगुडे, निखिल शिंदे (व्यवस्थापन), राकेश घोलप, सुधीर फडतरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या आहेत.

भूषण कुलकर्णी, कौशिक केळकर, मुकुंद कोंडे-देशमुख, देवांग शितूत यांनी साथसंगत केली आहे. ओंकार कपलाने, वज्रांग आफळे, बद्रिश कट्टी, अनुष्का आपटे, शर्व कुलकर्णी, अनुजा जोशी, प्रसाद कुलकर्णी, संचिता जोशी, ईशान जबडे, पार्थ बापट, श्रीशैल शेलार, शार्दुल निंबाळकर, सिद्धांत गवारे, अमित नगरकर हे युवा कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

नाटकास मिळालेली पारितोषिके

सांघिक प्रथम – संगीत आनंदमठ
दिग्दर्शन प्रथम – रवींद्र सातपुते
नाट्यलेखन प्रथम – विनिता तेलंग
संगीत दिग्दर्शन प्रथम – अजय पराड
नेपथ्य प्रथम – जयंत टोले
उत्कृष्ट अभिनय – रौप्य पदक – वज्रांग आफळे
उत्कृष्ट गायन – रौप्य पदक – अनुष्का आपटे
गायन गुणवत्ता प्रमाणपत्र – अनुजा जोशी

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular