गोल्डन आय न्युज नेटवर्क
भरत नाट्य संशोधन मंदिर पदाधिकारी निवड बिनविरोध !!
अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे तर कार्याध्यक्षपदी अभय जबडे !!
पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे तर कार्याध्यपदी अभय जबडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधाण सभा रविवारी झाली. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पांडुरंग मुखडे
सन 2024-25 या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, विश्वस्त (सर्वसाधारण) रवींद्र खरे, प्रतिभा दाते, प्रदीप रत्नपारखी, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्योपाध्यक्ष चारुलता पाटणकर, कार्यवाह संजय डोळे, सहकार्यवाह राजेंद्र उत्तुरकर, खजिनदार अविनाश बेलसरे, नियामक मंडळ सदस्य शंतनू खुर्जेकर, अपर्णा पेंडसे, दीपक दाते, कार्यकारी मंडळ सदस्य प्रचिती सुरू, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी, प्रियांका गोगटे, अंतर्गत आय-व्यय निरीक्षक अविनाश ओगले यांचा समावेश आहे. मोहन मुळ्ये यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
संस्था स्थापनेचे 130वे वर्ष सुरू होत आहे. या निमित्त संस्थेद्वारे येत्या वर्षात एकूण 130 सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा मानस आहे. यात गद्य व संगीत नाटके, एकांकिका, बालनाट्ये, कथाकथन असे कार्यक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या खेरीज स्वस्त नाटक योजना व विद्यालयातर्फे नियमित देण्यात येणारे नाट्य-नृत्य-गायन प्रशिक्षण हे उपक्रम सुरू राहणार आहेत. 130 वर्षांची अखंडित परंपरा जपणाऱ्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित उपक्रमांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
– पांडुरंग मुखडे, अध्यक्ष, भरत नाट्य संशोधन मंदिर
जाहिरात