गोल्डन आय न्यूज नेटवर्क
फुले-आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे गुरुवारी आयोजन.!!
पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागर ज्योतिबा अन् बाबांच्या विचारांचा, देशाचा हिताचा’ या उपक्रमाअंतर्गत गुरुवार, दि. 11 एप्रिल रोजी फुले-आंबेडकर पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) राष्ट्रपितामह ज्योतिबाराव फुले पुरस्कार तर माईंड पॉवर ट्रेनर व राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. दत्ता कोहिनकर यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रम सकाळी 11 वाजता समता भूमी, महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, युवराज बनसोडे यांनी दिली.
पुरस्काराचे वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत. माजी आमदार दीपक पायगुडे तसेच लताताई राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
जाहिरात