गोल्डन आय न्यूज नेटवर्क
जितोचा 18वा वर्धापन दिन, सेवा गौरव सोहळा मंगळवार, 2 एप्रिल रोजी
स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांच्या हस्ते प्रमिलाताई साकला यांचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान !!
पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाचा 18वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या वेळी श्रीमती प्रमिलाताई नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्कराने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जितो पुणे विभागाचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल आणि वर्धापन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. विशाल शिंगवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
18वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी 5:30 वाजता बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजय उदयबाबू शहा, सामाजिक सेवेसाठी विनोद शंकरलाल राठोड, व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजित सोहनलाल जैन, युवा उद्योजक सुधेंदू चैतन्य शहा, डॉ. पूजा अभिजित लोढा तसेच संस्थात्मक कार्यासाठी आणि माहिती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रुतभवन श्रुतदीप रिसर्च फौंडेशन यांचा गौरव केला जाणार आहे.
प्रमिलाताई नौपतलाल साकला
अयोध्येतील श्री रामजन्म भूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त, खजिनदार स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांची कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. पूनावाला फिनकॉर्पचे कार्यकारी संचालक अभय भुतडा, पिनन्स कमर्शिअल्सचे संचालक सौरभ बोरा यांची उपस्थिती असणार आहे.
जितो अपॅक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, श्रमण आरोग्यम्चे उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो ॲडव्हायझरीचे ॲड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, रवींद्र सांकला, जेएटीएफ अपॅक्सचे उपाध्यक्ष इंदर जैन, अपॅक्सचे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जितो महिला विभाग अध्यक्ष संगीता ललवाणी, जितो क्रीडा विभागाचे अध्यक्ष विशाल जोरडिया, जितो जे पॉईंट अपॅक्सचे अध्यक्ष अजय मेहता, जितो आर. ओ. एम. झोनचे अध्यक्ष अजित सेठिया, जेएटीएफ जितो आर. ओ. एम. झोन अध्यक्ष इंदरकुमार छाजेड यांची उपस्थिती असणार आहे.
जाहिरात