गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भरत नाट्य संशोधन मंदिराचा 32वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव बुधवारपासून !
पुणे : सुमारे 130 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर या नाट्य संस्थेच्या 32व्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला बुधवारपासून (दि. 8) सुरुवात होत आहे.
नाट्य रसिकांसाठी पर्वणी असलेल्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सव बुधवार, दि. 8 मे ते रविवार, दि. 12 मे या कालावधीत भरत नाट्य मंदिरात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात गाजलेल्या नाट्यकृतींचा नव्याने रसास्वाद घेता येणार आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
महोत्सवात दि. 8 रोजी सं. ययाती आणि देवयानी, दि. 9 रोजी सं. मानापमान, दि. 10 रोजी सं. लावणी भुलली अभंगाला, दि. 11 रोजी सं. सौभद्र आणि दि. 12 रोजी सं. कट्यार काळजात घुसली या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. राम साठ्ये, रवींद्र खरे, कौस्तुभ परांजपे, ऋषिकेश बडवे, वज्रांग आफळे, गौरी पाटील, अनुष्का आपटे, निधी घारे, स्वरप्रिया बेहरे, चारूलता पाटणकर, भक्ती पागे, अभय जबडे, विश्वास पांगारकर यांच्या नाटकात भूमिका आहेत.
संजय गोगटे, राहुल गोळे, प्रसाद करंबेळकर, वरद सोहनी, प्रसाद जोशी, हिमांशु जोशी, मुकुंद कोंडे, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार, प्रज्ञा देसाई साथसंगत करणार आहेत.
वासंतिक नाट्य महोत्सवाच्या तिकिट विक्रीला सुरुवात झाली असून तिकिट दर अत्यंत अल्प ठेवण्यात आले आहेत. सिझन तिकिट 1200/- रुपये तसेच 800/- रुपये आहे; तर दैनंदिन तिकिट दर 300/- रुपये आणि 200/- रुपये आहे.
पारंपरिक, लोकप्रिय तसेच सामाजिक विषयांवरील नाट्यकृती सादर करण्याची भरत नाट्य संशोधन मंदिराची परंपरा आहे. संस्थेची दहापेक्षा अधिक नाटके तयार असून त्यातील पाच नाटके महोत्सवात सादर केली जाणार आहेत.
–-–——————–———————-–———–
जाहिरात