गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर पुणे फेस्टिवल पुरस्काराने सन्मानित !!
पुणे : ३६ व्या पुणे फेस्टिवलमध्ये मा उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार ह्यांच्या हस्ते ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर ह्यांचा मनाच्या पुणे फेस्टिवल पुरस्काराने गौरव केला गेला . प्रभावी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना ह्या सन्मानाने पुरस्कृत केले जाते . ह्या प्रसंगी खासदार सुनेत्राताई पवार व पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व्यासपीठावर उपस्थित होते .
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून डॉ दीपक शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख , ५७ पुस्तके , अभ्यासपूर्ण व्याख्याने , समुपदेशन ह्या मार्गाने ते उद्याची युवापिढी सक्षम व कौशल्य पूर्ण घडवू इच्छितात.
दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हावे यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत.
_________________________________________________
जाहिरात