गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ऐतिहासिक माहितीच्या “बलोच “मराठी चित्रपटास पिरंगुटच्या ‘संस्कार स्कुल ‘मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद !!
पुणेः- मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील ‘संस्कार प्रायमरी स्कुल ‘च्या विद्यार्थ्यांना मराठ्यांची यशोगाथा मांडणारा “बलोच”हा मराठी चित्रपट येथे प्रथमच दाखविण्यात आला.त्यास विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचे कडुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .त्यानुसार संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यालय व महाविद्यालयात हा चित्रपट दाखविण्याचा निर्धार निर्मात्यानी केला .
पाणिपतच्या युध्दात कैद झालेल्या मराठ्यांची यशोगाथा मांडणारा हा चित्रपट असुन त्यामधील दृष्य पाहतांना अंगावर शहारे येत असल्याचे येथील प्रेक्षकांनी अनुभव व्यक्त केले.हा चित्रपट पाहत असतांना विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.या चित्रपटातुन अपरिचित इतिहास आवडला असल्याचे प्रामुख्याने कु.वरद संतोष सातपुते,कु.आर्यन विजय थरकुटे आदी विद्यार्थ्यांंनी सांगितले.
हा अपरिचित इतिहासाचा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांंनी माहितीसाठी अवश्य पाहावा.असे आवाहन संस्कार स्कुलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साठे,संचालिका सौ.स्नेहा साठे यांनी केले.प्रामुख्याने हा ऐतिहासिक “बलोच ” चित्रपट पिरंगुट येथील या शाळेत नुकताच प्रथमच दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठीउत्कृष्ट असे नियोजन शिक्षकवृंद प्रशांत देशमुख ,सुमिना राणा,अश्विनी नलावडे,पल्लवी उंडेगावकर,दिपाली आंबेकर,दिपाली भावसार,सुनिता कोले,सुरेखा शेळके यांनी केले.यावेळी या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते गणेश शिंदे ,निर्माती सौ.किर्ती वराडकर ,चारुदत्त वराडकर यासोबत कार्यकारी निर्माते संतोष खरात,निर्मिती व्यवस्थापक स्वानंद देव सहाय्यक निर्मिती व्यवस्थापक रोहित ओव्हाळ,सहाय्यक व्यवस्थापक डाॕ.विनील धोत्रे,नयुम पठाण,नितीन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात माहितीचा व मार्गदर्शक ठरणारा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी व विद्यालय ,महाविद्यालयात दाखविण्यात येणार असुन सदरील चित्रपट हा अल्पदरात पाहता येणार आहे.
असे निर्माते गणेश शिंदे व सौ.किर्ती वराडकर यांनी सांगितले .तसेच सदरील चित्रपटाच्या आयोजनासाठी संबधितांना संपर्क केल्यास आधिक माहिती व नियोजन करता येईल .लवकरच याबाबत सर्व शाळेत चित्रपट दाखविण्यासाठी विविध माध्यम व प्रचार-प्रसार कार्यातुन संपर्क करण्यात येईल.असेही प्रसिध्दी प्रमुख आत्माराम ढेकळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जाहिरात