गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बालनाट्य महोत्सवाला जल्लोषात सुरुवात !
पुणे : साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, आदर्श मित्र मंडळ धनकवडी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य महोत्सवाला आज (दि. 23) जल्लोषात सुरुवात झाली. गंमत शाळा आणि अभिरुची वर्गातील मुलांनी दोन एकांकिकांचा आनंद लुटला.
बालनाट्य महोत्सवाचे तिसरी घंटा देऊन उद्घाटन करताना मुले. समवेत पीयुष शहा, उदय जगताप, शिरीष मोहिते, हर्षद राजपाठक, सोहम आठवले.
गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रिप्स’ पद्धतीने निर्मिती केलेली बालनाट्ये या निमित्ताने मुलांना विनामूल्य दाखविण्यात येत आहेत. पीयुष शहा, उदय जगताप, शिरीष मोहिते, युवा कलावंत हर्षद राजपाठक, सोहम आठवले आणि मुलांच्या उपस्थितीत तिसरी घंटा वाजवून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन समारंभानंतर ‘मिस कम्युनिकेशन’ आणि ‘चेरी एके चेरी’ या एकांकिकांचा मुलांनी आंनद लुटला. दि. 24 रोजी सायंकाळी 4.15 वाजता ‘आलयं आमच्या लक्षात’ आणि सायंकाळी 6.15 वाजता ‘पक्का लिंबू टिंबू’ या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सव विनामूल्य असून मुलांनी बालनाट्य महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पीयुष शहा यांनी केले आहे.
एकांकिकांमधील एक प्रसंग.
गणेश मंडळांच्या माध्यमातून उदय जगताप आणि शिरीष मोहिते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती देत पीयुष शहा यांनी बालनाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. उदय जगताप आणि शिरीष मोहिते यांच्या हस्ते मुलांना पुस्तकांची भेट देण्यात आली.
जाहिरात