गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फे शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!!
डॉ. मनोहर जाधव यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार !
पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, वक्ते, विचारवंत स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतिदिन आणि डॉ. फडकुले यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. 16) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात होणार आहे.
डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांना, संत साहित्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ.
विजय लाड यांना, लोकहितवादी पुरस्कार स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे आणि साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांना तर साहित्य पुरस्कार डॉ. जगदिश कदम लिखित ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या
कवितासंग्रहास, डॉ. संदीप सांगळे लिखित ‘मध्ययुगीन दलित संतकविता: सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन’ या ग्रंथास तसेच ‘पत्नीपुराण’ या ग्रंथासाठी डॉ. रवींद्र तांबोळी यांना प्रदान केला जाणार आहे.
अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे दिली.पुरस्कार वितरण अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी असणार आहेत.
कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी दिली
जाहिरात