गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पदमभूषण चंदू बोर्डे ह्यांच्या हस्ते डॉ दीपक शिकारपूर सन्मानित !!
pune : पहिले रोटरी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले . ह्या संमेलनात ज्येष्ठ लेखकांचा सन्मान केला गेला . ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर ह्यांचा क्रिकेटपटू पदमभूषण चंदू बोर्डे ह्यांच्या हस्ते त्यांच्या दीर्घ साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान केला गेला . व्यासपीठावर रोटरी प्रांतपाल शीतल शहा , प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे , ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील आदी उपस्थित होते.
डॉ शिकारपूर गेली चार दशकं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत .विविध वृत्तपत्रातून येणारे लेख , 59 पुस्तके , अभ्यासपूर्ण व्याख्याने , समुपदेशन ह्या मार्गाने ते उद्याची युवापिढी सक्षम व कौशल्य पूर्ण घडवू इच्छितात. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हावे यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत.
ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत. संमेलनांत डॉ शिकारपूर ह्यांच्या अध्यक्षतेखाली एआय चा साहित्यावर होणारा परिणाम ह्यावर विशेष परिसंवाद आयोजित केला होता