गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अभिनेता ऋषीकेश मुंढे ची अभिनय क्षेत्रात गगनभरारी*….
,,,’उदे ग अंबे उदे’मालिकेत पहिल्यांदा जोरदार एंट्री….
मराठवाड्यातील धडाडीचा युवा कलावंत ऋषीकेश मुंढे पुण्यनगरी ,मुबैं सारख्या ठिकाणी अभिनय क्षेत्रात उंच गगनभरारी घेत असल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
सध्या “स्टार प्रवाह”चॕनेल वरील लोकप्रिय मालिका “उदे ग अंबे उदे “या मालिकेत एंट्री करतो आहे.या क्षेत्रात अभिनय सादर करण्याची तीव्र इच्छा बाळगुण जिद्दीने यश संपादन करीत आहे.प्रामुख्याने सध्या ऋषीकेश फार्मसी शिक्षण घेत अभिनय क्षेत्रात छाप पाडत आहे.
हे विशेष ! शिक्षण आणि अभिनय याचा प्रवास करीत असतांना त्याचे म्हणणे असे आहे की,भाकरी दोन्ही बाजुनी भाजुन खाल्ली तर चव एकच असते.तसेच ऋषीकेशचे शिक्षण अन अभिनयाच्या बाबतीत आहे.यासाठी मुंबई -पुणे प्रवास करीत असतांना भाकरी दोन्ही बाजुनी भाजण्याचा प्रयत्न आहे.
“उदे ग अंबे उदे “या मालिकेत ऋषीकेशचा प्रथमच फाईट सिक्वेंश आहे.याबाबतीत त्याचे असे म्हणणे आहे की,या क्षेत्रात कलाकार म्हणुन मी जगत असतांना नवनवीन रुप धारण करायला मला मिळतात.आणि कधीही न अनुभवलेला अनुभव मला सहज मिळुन जातो.त्यामुळे माणुस म्हणुन जगण्यास मी खमका होतो .
फाईटींग सीन साकारतांना त्याला जाणवल्या.असे तो म्हणतो.सध्याच्या ५जीबी इंटरनेटच्या काळात ऋषीकेश सारखा तरुण त्याची यशाची शिखरे कष्ट करुन हळुहळु गाठत आहे.मराठवाड्यातील अंबाजोगाई पासुन त्याने सुरु केलेला प्रवास पुण्यापर्यंत आला.
आणि नंतर त्याने अभिनयाच्या स्वप्न पुर्ततेसाठी मुंबई ची वाट धरली.अशा या गरुडझेप घेणाऱ्या ऋषीकेश मुंढे या कलाकाराला नवीन मालिका “उदे ग अंबे उदे”दररोज सायंकाळी ६वाजता पाहायला विसरु नका…..