गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
कष्टाचा बोळ, नारायण पेठ, पुणे ३०
सेवाकार्य – दिवाळीनिमित्त कातकरी बांधवांना कपडे, फराळ वाटप
वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
११ नोव्हेंबर २०२३
आपल्या समाजात असे काही लोक आहेत ज्यांना रोजची खायची भ्रांत आहे, ते दिवाळी साजरी करू शकत नाहीत. त्यांच्या साठी मंडळाच्यावतीने कपडे फराळ वाटप करण्यात आले.
शनिवार ११ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त भोर, वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागातील चेलाडी, कोंढणपुर , खोपी, वाघाजवडी, नसरापूर, किकवी (वागाजवाडी) येथील कातकरी वस्तीवर राहणाऱ्या वंचित १५० कुटुंबांतील ७०० पेक्षा जास्त अबाल वृध्द गरजू नागरिकांना कपडे, दिवाळी फराळ भेट देण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय जी पुरंदरे, रा. स्व. संघाचे प्रचारक शुभम पाटील, माजी सरपंच अनिल शेटे, विठ्ठल वाडकर, अक्षय गोगावले, अमोल चावरे, मयूर महामुनी, रामदास गाडे, दत्ता गाडे.
रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट चे दिलीप देशपांडे, सहील शहा, श्री. लोहार उपस्थित होते.
मंडळाने दिवाळीच्या आधी आठ दिवस नागरिकांना कपडे देण्याचे आवाहन केले होते. मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नारायण पेठेतील नागरिक, पुणे LIC ऑफिस कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट चे सभासद यांनी चांगले, वापरण्यायोग्य कपडे मंडळात आणून दिले. या कपड्यांचे स्त्री पुरुष, लहान मुले अश्या वयोगटानुसार वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थित गठ्ठे बांधण्यात आले. यासाठी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फराळ मिठाई देण्यासाठी मंडळाचे आधार स्तंभ, शार्प कंपनी चे जिल्हा वितरक विनोदशेठ सांखला यांनी विशेष सहकार्य केले.
यंदा मंडळातील बाल, युवक, युवतींना आणि कार्यकत्यांच्या घरातील महिलांना तसेच शालेय वयोगटातील मुला-मुलींना वाड्या-वस्त्यांवर, पाड्यांवर मुद्दाम नेले होते.
पुण्याजवळ अगदी तीस-चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या वाड्यांवर काय परिस्थिती आहे, तेथील लोकांना किती अडचणी सोसाव्या लागतात, हे तिथे गेल्यानंतर सर्वजणांना पहायला मिळालं. तेथील चित्र पाहिल्यानंतर काही न सांगताही समाजासाठी काही तरी केलंच पाहिजे, हा संस्कार प्रत्येकावर होतो. नकळत होणारा हा संस्कार खूप मोलाचा ठरतो.
या उपक्रमासाठी मंडळाचे गुरुदत्त डिंगरे, अमोल भालेराव, प्रतीक मोहिते, आदेश पवार, सिद्धांत महांकाळे, दीपक उभे, संदीप उभे, किरण शिंदे, कुणाल आहेर, विकास वाघमारे, गौरी भालेराव, श्रिया भालेराव, मेघा वाघमारे, श्रुती भालेराव, मनीषा उभे, दिशा उभे, पौर्णिमा पाखरे, राधेय डिंगरे, राशी शिंदे, विहा शिंदे, रुपेश पाखरे, प्रज्ञेश पाखरे, देवेश गायकवाड, शिवम रकटे उपस्थित होते.
अजित परांजपे
अध्यक्ष
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
नारायण पेठ पुणे
9422332941
9372244613
जाहिरात