गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य जीवन गौरव पुरस्कार अंजली कुलकर्णी यांना जाहीर !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
अंजली कुलकर्णी
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे?
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात विजय सातपुते, सुजित कदम, स्वप्नील पोरे, मिलिंद शेंडे, राजश्री सोले, राजश्री महाजनी, स्वाती दाढे, मीना सातपुते, स्वाती यादव, माया मुळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, आशा ठिपसे, डॉ. रेखा देशमुख, वैजयंती विझें-आपटे यांचा सहभाग असणार आहेत.
ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.