गोल्डन आय न्युज नेटवर्क
पुणे : उर्दू गझलचे सौंदर्य मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य डॉ. शशिकला शिरगोपीकर गेली चाळीस वर्षे करत आहेत. त्यांच्या संगीतमय जिवनावर आधारीत “नोट्स अनसंग” या माहितीपटाचे प्रदर्शन देवांग मेहता ऑडिटोरीयम येथे झाले.
माजी आमदार व संगीत प्रेमी उल्हास पवार यांची प्रमुख अतिथी होते तर अध्यक्षस्थानी पंडित रघुनंदन पणशीकर होते.
पंडित रघुनंदन पणशीकर यांनी त्यांच्या भाषणात ते व शशिकलाताई, ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत असतानाचे किस्से सांगितले व गजलचा एक शेरही सादर केला.
दीप प्रज्वलनप्रसंगी (डावीकडून) अभिजित कोल्हटकर, सुरेशचंद्र सुरतवाला, डॉ. शशिकला शिरगोपीकर, शिल्पा गोडबोले.
शशिकलाताईंसारख्या कलाकारांच्या कार्याची दखल घेऊन त्याचे डॉक्युमेंटेशन करुन भावी पिढी पर्यंत ते पोहचवण्याची गरज असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले.
रिव्हर्ब स्टुडिओजचे व्यवस्थापक अभिजीत कोल्हटकर यांनी आजच्या युगात प्रत्येक कलाकाराने जगभरातल्या लोकांपर्यत पोहचण्याकरिता आवश्यक असलेले ‘डिजिटल प्रेझेन्स’चे महत्व पटवून दिले तर दिग्दर्शिका शिल्पा गोडबोले यांनी माहितीपटाच्या निर्मितीचा हेतू व निर्मितीदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल माहित दिली.
कार्यक्रमास संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अनुराधा मराठे, मीरा पणशीकर, मधुवंती दांडेकर, मानसी मागीकर, गौतम मुर्डेश्वर, पंडित केशवराव गिंडे तसेच वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ व्हि. डी. रानडे, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सिद्धार्थ तातूसकर, ॲकॉर्ड इक्विपमेंटस्चे व्यवस्थापक कौशल शहा व कलाप्रेमी व्यावसायीक सुरेशचंद्र सुरतवाला यांची उपस्थिती होती.
ह्या फिल्मची निर्मिती पुण्याच्या रिव्हर्ब स्टुडिओज या संस्थेने केली असून याचे दिग्दर्शन शिल्पा गोडबोले व अभिजित कोल्हटकर यांनी केले आहे.
पंडित रघुनंदन पशणीकर यांचे स्वागत करताना अभिजित कोल्हटकर.
रिव्हर्ब स्टुडिओज ही संस्था गेली दहा वर्षे कलाकार तसेच कॉर्पोरेटस्स् ना ‘डिजिटल प्रेझेंन्स’ करिता लागणारा कंटेंट तयार करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक मदत करत आहे.
डॉ. शशिकला शिरगोपीकर यांनी गंधेबुवा, पं. जानोरीकरबुवा, विद्याधर पंडित, स्वरराज छोटा गंधर्व, जयमालाबाई शिलेदार आणि किशोरीताई अमोणकर यांच्याकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगिताचे शिक्षण घेतले. त्यांचे कार्यक्रमही ठिकठिकाणी होऊ लागले होते. सांगीतिक प्रवास सुरू असतानाच, त्यांनी प्राणीशास्त्र ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन गरवारे महाविद्यालय येथे झुओलॉजी प्रोफेसर म्हणून 33 वर्षे काम पाहिले.
गझल या विषयाचे त्यांना अत्यंत आकर्षण होते. सत्तरच्या दशकात त्यांनी उस्ताद आसिफ खानसाहेब यांच्याकडे गझल कशी सादर करायची याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गझल समजून घेण्यासाठी उर्दू भाषेचा अभ्यास आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उर्दू भाषेचे प्रशिक्षण घेतले. उर्दू गझल या विषयात त्यांनी पी.एच.डी. ही पदवी मिळवली. डॉ. शशिकला शिरगोपीकर यांच्या प्रदीर्घ सांगीतिक व शैक्षणिक कारकिर्दिचा प्रवास केवळ एका तासाच्या “नोट्स अनसंग” या माहितीपटामध्ये पहायला मिळतो.
जाहिरात –
जाहिरात –