Marathi FM Radio
Tuesday, July 21, 2026

पुण्यातील विष्णुदीप सोसायटीत ‘घरोघरी गीतरामायण’ उपक्रमांतर्गत हटके म्युझिक ग्रुपचा बहारदार गीतरामायण कार्यक्रम !

Subscribe Button

 

Advertisement

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

पुण्यातील विष्णुदीप सोसायटीत ‘घरोघरी गीतरामायण’ उपक्रमांतर्गत हटके म्युझिक ग्रुपचा बहारदार गीतरामायण कार्यक्रम

Advertisement

पुणे : १९ जुलै २०२६ हटके म्युझिक ग्रुपच्या “घरोघरी गीतरामायण” या अभिनव संकल्पनेअंतर्गत पहिल्या पुष्पाचे संस्मरणीय आयोजन १९ जुलै २०२६ रोजी विष्णुदीप सोसायटी, सहकारनगर क्र. २, पुणे येथे करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या कार्यक्रमात गीतरामायणातील सुमारे १५ निवडक गीतांचे हटके शैलीतील सादरीकरण करण्यात आले.

Advertisement

Advertisement

या कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीतील श्री. भानू यांनी आपल्या ८५ वर्षीय मातोश्रींना गीतरामायणाचा आनंद घरच्या घरी अनुभवता यावा या भावनेतून केले होते. योगायोगाने हटके म्युझिक ग्रुपच्या सदस्या सौ. सुनंदा चितळे याही याच सोसायटीत वास्तव्यास असल्याने या कार्यक्रमाला विशेष आत्मीयतेचे स्वरूप लाभले.

हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुनंदा चितळे, माधवी देशपांडे, मोहना भिडे, उज्ज्वला घाटे, समीर चितळे, दिनेश कर्वे, गौरी ताम्हणकर, सुमेधा कुलकर्णी, पूजा रायकर आणि मकरंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. नियमितपणे सहभागी होणारे डॉ. ताम्हणकर, अरुण तांबे आणि स्वाती सोनसळे यांना अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहता आले नाही.

हटके म्युझिक ग्रुपची “एक गाणे – अनेक कलाकार” ही आगळीवेगळी सादरीकरण पद्धत, शिळवादनासह विविध वाद्यांचा सुरेल वापर आणि समूहाने स्वतः स्टुडिओमध्ये तयार केलेल्या दर्जेदार कराओके ट्रॅक्समुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली. प्रत्येक गीत नव्या रंगात सादर होत असल्याने उपस्थित श्रोते संपूर्ण कार्यक्रमभर मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमातील शिरीष कुलकर्णी यांचे विश्वविक्रमी शिळवादन रसिकांनी विशेष दाद देऊन गौरविले. तसेच समीर चितळे यांनी साकारलेला “दशरथा” आणि “ज्येष्ठ तुझा पुत्र मला” या गीतातील त्यांची भावपूर्ण अभिव्यक्ती उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.

हटके ग्रुप ने म्हटलेल्या “नकोस नौके” आणि “सेतू बांधा रे” यांसारख्या समूह गीतांच्या सादरीकरणावेळी सर्व श्रोते टाळ्यांच्या गजरात आणि गीतांच्या गायनात सहभागी झाले. त्यामुळे कार्यक्रम केवळ श्रवणीय न राहता एक सामूहिक सांगीतिक अनुभव ठरला.

u

हटके म्युझिक ग्रुपचे सर्व सदस्य आपापल्या नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाजापर्यंत मराठी संगीताचा आणि गीतरामायण या अजरामर काव्यसंग्रहाचा वारसा पोहोचविण्याचे कार्य निःस्वार्थपणे करत आहेत.

 

संस्थापक शिरीष कुलकर्णी यांच्या “घरोघरी गीतरामायण” या अभिनव संकल्पनेमुळे ज्येष्ठ नागरिक, सोसायट्या आणि सांस्कृतिक संस्थांपर्यंत हा सांगीतिक वारसा थेट पोहोचत असून या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हटके म्युझिक ग्रुपच्या या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत पुढील अशाच कार्यक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular