गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : एस स्पेक्युलम ( ACE Speculum) या बिझनेस ट्रेनिंग संस्थेच्या आठव्या वर्धापनदिना निमित्त उद्योजकांचा मेळावा , सन्मान गौरव आणि पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
‘एस – टेस्ट ऑफ सक्सेस’ या विशेष नावाने होत असलेला हा सोहळा रविवार, दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 3 ते रात्री 9 या वेळात असोदित बँक्वेट हॉल, सिजन्स मॉलशेजारी, हडपसर येथे होत असल्याची माहिती एस फॅमिलीचे संस्थापक श्री. रवी प्रकाश आणि सौ. श्वेता रवी प्रकाश यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना नाममात्र शुल्कात व्यवसायवाढ व विकासासाठी योग्य समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन, शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन ‘भ्रांतीपासून यशाच्या क्रांती’पर्यंत नेण्याच्या पवित्र उद्देशाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल 2015 रोजी एस स्पेक्युलम परिवाराची आपण स्थापना केली असल्याचे श्री. रवी प्रकाश आणि सौ. श्वेता रवी प्रकाश यांनी सांगितले.
गेल्या आठ वर्षांत या परिवारात 1700 पेक्षा अधिक व्यावसायिक जोडले गेले आहेत. एस स्पेक्युलम परिवारात प्रशिक्षित झालेल्या या व्यावसायिकांनी आपल्या उद्योगात विविध प्रकारची एस स्पेक्युलम प्रणित शास्त्रीय तंत्रे, सूत्रे, रणनीती वापरून आपल्या उद्योगात दिमाखदार कामगिरी केली आहे. याची उदाहरणे द्यायची झाली तर येवले अमृततुल्य, नादब्रम्हा इडली, माणिक मोबाईल, अमीर चिकन, सलगर चहा, लक्ष्य गुरुकुल, बिग्रो सक्सेस एज्यूकेशन प्रा. ली., युनिसेक मॅनेजमेंट सर्वीसेस प्रा. ली., मनारा लाइफसायन्स, ब्ल्यू कॅट कम्प्युटर्स, कृष्णा ग्रेन्स प्रा. ली., झील इंड्रस्टीज, आर टेक्स इलेक्ट्रॉनिक्स, राजेशाही फुड ॲंड हॉस्पीटॅलिटी, वास्तुप्रसाद, गोल्डन आय मिडीया अँड एंटरटेनमेंट, नेक्सेल, गोकुळ ॲग्रो टुरिझम, गोल्डन केक्स, बोपदेव माची रिसोर्ट इत्यादी.
कोविड-19 मुळे सर्व सभासद कोविड पूर्व आणि कोविड नंतर अशा दोन भागात विभागले गेले आहेत.
या सर्व सभासदांना एकत्रित आणून त्यांच्यात व्यावसायिक नाते तयार होण्यासाठी, यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांचे अनुभव ऐकण्यासाठी, आपला व्यवसाय वाढावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे श्री. रवी प्रकाश आणि सौ. श्वेता रवी प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मेळाव्यात सभासदांना विविध संधींचा शोध घेणे, विचार मांडणे, आपल्या व्यवसायाची माहिती सर्व नव्या-जुन्या सभासदांना प्रत्यक्ष भेटून एकमेकांपर्यंत पोचविणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमात उद्योजकांचा सन्मान – गौरव, सत्कार व पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमाला दिग्गज राजकीय, उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. व्यवसायात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांचे मार्गदर्शनसुद्धा याप्रसंगी लाभणार आहे.
या कार्यक्रमाची सुखद, सोनेरी आठवण राहण्यासाठी ‘एस – टेस्ट ऑफ सक्सेस’ या नावाने स्मरणिका सुद्धा कार्यक्रमानंतर प्रसिद्ध केली जाणार आहेत. आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची अविस्मरणीय छायचित्रे या स्मरणिकेत असणार आहेत.
जाहिरात – Click on image for more details
जाहिरात – Click on image for more details