गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : गझल हा काव्यप्रकार मोठा विलक्षण आहे. गझलेल्या केवळ दोन ओळींमध्ये खूप मोठा आशय दडलेला असतो. गझलेचे तंत्र जाणून घेतले की लिखाणात सहजता येते. गझल हा काव्यप्रकार हळव्या मनाच्या व्यक्तींना प्रेमात पाडणार आहे, असे प्रतिपादन रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी केले.
रंगत संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठान, साहित्यदीप प्रतिष्ठान आणि ब्रह्मकमळ साहित्य समूहातर्फे ‘मराठी गझल : आकृती आणि आशय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. आडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुरुतीस मान्यवरांनी कवी, गझलकार सुरेश भट यांना अभिवादन केले.
कवी, गझलकार सुरेश भट यांना अभिवादन करताना ॲड. प्रमोद आडकर, वैभव कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, विशाल राजगुरू, भूषण कटककर, दास पाटील.
कार्यशाळा आयोजना विषयीची माहिती ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविकात दिली.
ॲड. प्रमोद आडकर यांचे स्वागत विशाल राजगुरू यांनी केले.
उदघाटन सत्रानंतर आयोजित चर्चासत्रात भूषण कटककर यांनी नवोदित गझलकारांशी संवाद साधला. ‘गझलेचे तंत्र’ या विषयावर वैभव वसंतराव कुलकर्णी आणि दास पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
ॲड. प्रमोद आडकर यांचा सत्कार करताना विशाल राजगुरू.
कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात आयोजित मुशायरामध्ये अनिरुद्ध वासमकर, नागेश नायडू, एकानथ धनके, संदीप मर्ढेकर, गोकुळ सोनवणे, प्रमोद खराडे, विजय उतेकर, पूजा फाटे, सतीश मालवे, प्रशांत पोरे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन रेखा कुलकर्णी आणि वैशाली माळी यांनी केले. आभार विशाल राजगुरू यांनी मानले.
जाहिरात – Click on image for details
जाहिरात
जाहिरात – Click on image for details