गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांचे सबलीकरण , सक्षमीकरण करण्याबरोबरच महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे दि. 7 ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन पुण्यात प्रभात रोड येथे करण्यात आले आहे.
प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड , पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 7 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ज्येष्ठ पत्रकार चैत्राली चांदोरकर यांच्या हस्ते होणार असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. गीताली टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रदर्शनात ज्वेलरी , ड्रेसमटेरिअल , कॉस्मेटिक , बॅग्ज , पर्सेस , आयुर्वेदिक औषधे, पेंटिंग्जचे स्टॉलस् असणार आहेत. खवय्यांसाठी पावभाजी, लोणी-थालिपीठ , वडापाव, चतुर्थीनिमित्त खास उपवास कचोरी, साबुदाणा वडा, उपवास भेळ इत्यादी व्यंजनांची मेजवानी असणार आहे.
जाहिरात –
जाहिरात –
जाहिरात –
Share
0