भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे पुणे येथे स्वराधीश ही खुली गायन स्पर्धा !
ह्या बाबत भाजपा चित्रपट आघाडीचे संपर्क प्रमुख अजय नाईक व जनसंपर्क प्रमुख कौस्तुभ दबडगे यांनी माहिती देतांना सांगितले की भाजपा चित्रपट कामगार व कलाकार आघाडी तर्फ़े नेहेमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
त्यातीलच एक पुढील कार्यक्रम म्हणजे खुली गायन स्पर्धा.
ह्या कार्यक्रमाविषयी भाजपा चित्रपट कामगार आघाडी संपर्क प्रमुख *अजय नाईक* यांनी खालील प्रमाणे स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. जनसंपर्क प्रमुख *कौस्तुभ दबडगे* यांनी ह्या दुर्मिळ संधीचा जास्तीत जास्त कलाकारांनी उपयोग करावा असे यांनी आवाहन केले व खालील प्रमाणे स्पर्धेची माहिती दिली.
– स्पर्धेत भाग घेण्यासाठी *१२ नोव्हेंबर २०२२* ते *२१ नोव्हेंबर २०२२* या कालावधीत *Registration* करायचं आहे.
– भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी *Google Play Store* वरून *JustKolab App Download* करून त्यावर *Register* करायचं आहे.
– *Iphone* असल्यास *www.justkolab.com* या *Website* वरून Registration करता येईल
– Register केल्यानंतर स्पर्धकाला *Participant Number* देण्यात येईल व तसा *SMS*, Registration करताना दिलेल्या Mobile Number वर येईल.
– त्यानंतर स्पर्धकाने त्याच्या आवाजात गायलेल्या *एका गाण्याची MP3 File*, App वरून अथवा www.justkolab.com या Website वरून upload करून आम्हाला पाठवायची आहे.
– स्पर्धकांनी पाठवलेली गाणी आमचे परिक्षक ऐकतील व त्यातुन *अंतिम फेरी साठी स्पर्धक निवडण्यात येतील* व त्याची घोषणा *२२ नोव्हेंबर २०२२* ला www.justkolab.com Website वर करण्यात येईल
– अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना, अंतिम फेरी साठी त्यांनी गाण्यासाठी निवडलेल्या गाण्याचा *Karaoke Track*, JustKolab च्या माध्यमातुन Mp3 File च्या स्वरूपात *२४ नोव्हेंबर २०२२* पर्यंत पाठवावा लागेल.
– अंतिम फेरी *पुणे* येथे *२६ व २७ नोव्हेंबर २०२२* ला होईल व स्पर्धेच्या निकालाची घोषणा *२७ नोव्हेंबर २०२२* ला रात्री करण्यात येईल
– अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना कोथरूड पुणे येथे *DHWANI STUDIO या अद्ययावत Recording Studio* मध्ये परिक्षकांसमोर गाण्याची संधी मिळेल
– अंतिम फेरीतुन *विजेता* म्हणून *एक महिला* व *एक पुरुष* गायकाची निवड करण्यात येईल
– *विजेत्यांना प्रस्थापित संगीतकारानी संगीतबद्ध केलेलं एक नवं कोरं गाणं, एका अद्ययावत Recording Studio मध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाण्याची, पार्शवगायनाची (Playback Singing) संधी देण्यात येईल*
– विजेत्यांनी गायलेलं गाणं एका Video सह *Youtube, Spotify, Amazon Music, Jio Saavn, Apple Music* अशा मोठ्या माध्यमांतुन *जगभर प्रदर्शित करण्यात येईल*.
*JustKolab App इथुन Download करावे* :
https://play.google.com/store/apps/details?id=com.justkolab
*भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश*
————————————————–