सत्यवान गावडे झाले प्रदेश भाजपा कामगार आघाडीचे सचिव !
महाराष्ट्र प्रदेश भाजपा कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी भाईंदरचे सत्यवान गावडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा कामगार आघाडी तर्फे सांगण्यात आले.
सध्या सत्यवान गावडे हे भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी काम करत असून आताच्या ह्या पदाबरोबरच त्यांना ही विशेष जबाबरदारी देण्यात येत असल्याचे भाजपा तर्फे सांगण्यात आले.
सत्यवान गावडे यांना प्रदेश भाजपा कामगार आघाडीच्या सचिव पदाच्या नियुक्ती चे पत्र महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस व म्हाडाचे चेअरमन संजय केणेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
ह्या प्रसंगी झालेल्या समारंभात संजय केणेकर , सत्यवान गावडे , महाराष्ट्र भाजपा कामगार आघाडी चे अध्यक्ष गणेश ताठे , भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज व इतर पदाधिकारी उपस्थित होते असे भाजपा तर्फे सांगण्यात आले.