भाजपा तर्फे घेण्यात आलेल्या स्वराधीश गाण्याच्या स्पर्धेत पुण्याचा साहिल शेख व जयसिंगपूरची दिव्या मगदुम प्रथम !
भाजपा चित्रपट कामगार आघाडी व कलाकार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने, JustKolab च्या सहकार्याने स्वराधीश ही महाराष्ट्र राज्य पातळीवरील खुली गायन स्पर्धा पुणे येथील ध्वनी स्टुडिओ येथे दि 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली.
स्पर्धेत पुण्याच्या साहील शेख (पुरुष विजेता) व जयसिंगपुर ची दिव्या मगदुम (महिला विजेती) तसंच दीपक कुलकर्णी (पुरूष उपविजेते) व दिव्या भादलकर (महिला उपविजेती) यांनी बाजी मारली ! याच बरोबर स्वराज राजपूत व स्वरा नगरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आलं.
JustKolab App च्या माध्यमातुन जवळपास २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला, ज्यातुन ६० स्पर्धकांची अंतिम फेरी साठी निवड झाली. एरवी गायन स्पर्धा रंगमंचावर आयोजित होतात, परंतु ही स्पर्धा एका व्यावसायिक रेकॉर्डींग स्टुडिओ मध्ये आयोजित करण्यात आली होती.
पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, दौंड, कोल्हापूर, नागपूर, सांगली, जयसिंगपूर, संभाजीनगर (औरंगाबाद), अहमदनगर, जालना अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन या स्पर्धेसाठी गायक मोठ्या हौसेने प्रवास करत पुण्यात अंतिम फेरी साठी पोहचले! विशेष म्हणजे या स्पर्धेत ज्येष्ठ नागरीकांचा मोलाचा सहभाग होता व सर्व गायकांकडुन विविध प्रकारची मराठी व हिंदी गाणी सादर झाली असे आघाडी तर्फे सांगण्यात आले.
विजेत्यांना संगीतकार-दिग्दर्शक श्री. अजय नाईक यांनी स्पर्धेसाठी खास संगीतबद्ध केलेलं एक नवं कोरं गाणं गायची संधी मिळणार आहे व हे गाणं जगभर प्रदर्शीत करण्यात येईल असे अजय नाईक यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी ख्यातनाम गायक-संगीतकार लहु पांचाळ व प्रख्यात गायिका मंजूषा देशपांडे यांनी परिक्षणाचे काम पाहिले.
भाजपा चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख व पुणे जिल्हा शहर-प्रभारी कौस्तुभ दबडगे यांच्या सह पुणे जिल्हा टीम चे पदाधीकारी व सभासद नंदिनी पुरंदरे, मंजूषा देशपांडे, दिपाली कुलकर्णी, अनिता देशमुख, अश्विनी जोशी, पल्लवी फडणीस, वैशाली सोहनी, नूपूर कुलकर्णी, मृण्मयी कुलकर्णी, चैतन्य कुलकर्णी, अनंत दबडगे, हर्षद होळकर, कश्यप आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी यांनी सर्व कामांची जबाबदारी यशस्वी रीत्या पार पाडली असे भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे सांगण्यात आले.
याच बरोबर JustKolab टीम चे योगेश तांबडे, श्रीनीवास देशपांडे, श्री चव्हाण, अक्षय शिगवन, शुभंकर जोशी व अनुष्का नाईक यांनी मोलाची मदत केली असे आघाडी तर्फे सांगण्यात आले.
पुण्यातील कोथरूड मतदार संघातील भाजपा चे माजी नगरसेवक जयंत भावे यांनी स्पर्धे साठी मदत व मार्गदर्शन केले.
स्पर्धेला भाजपा च्या अनेक पुरूष व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवुन सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवले.
ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र व पुणे जिल्हा भाजपा चित्रपट कामगार आघाडी , JustKolab App व ध्वनी स्टुडिओ यांच्या वतीने अजय नाईक यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली.