भाविकांनी साजरा केला गुरु संतोषजी रांका बाबा यांचा वाढदिवस
(वृत्तसंकलकःआत्माराम ढेकळे )
पुणेः- येथील गंगाधाम परिसरात ॐविश्व नरेंद्र या वास्तुत गुरु संतोषजी रांका बाबा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात भाविक चाहत्यांनी साजरा केला.
प्रामुख्याने या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरु संतोषजी रांका बाबाची रांगोळीतुन प्रतिमा भाविक ईशा पाटोळे यांनी हुबेहूब साकारली.
अनेक शुभेच्छुकांनी या कलाकृतीचे कौतुक केले.
याप्रसंगी साईबाबा,सद्गुरु नरेंद्रनाथबाबा यांचे भजन व आरती करण्यात आली.यामध्ये प्रसिद्ध गायक अखिलेशकुमार शुक्ला (पंडीत) व शिवसहायसिंह (बनारसवाले)यांचा सहभाग होता.
कार्यक्रमात लहान मुले व भाविक ,चाहते यांनी नृत्यही सादर केले.विविध ठिकाणाहून भाविकांनी उपस्थिती दर्शविली.सर्व भाविकांना संतोषजी रांका बाबा व माऊली सौ.नीताजी रांका यांनी आशिर्वाद दिले .अध्यात्मज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांनीही वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.शेवटी सर्वांनी आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.
जाहिरात