चित्रपट निर्माते जगले तरच मराठी चित्रपट जगेल !
सध्या मराठी चित्रपट निर्मात्यांची परिस्थिती अशी आहे की सिनेमा काढायचा म्हटले की बजेट चे आव्हान व बजेट कसे बसे जमवून सिनेमा तयार झाला तरी थिएटर ची मारामार. मग साऊथ सारखे बिग बजेट सिनेमे होणारच कसे व झालेच तर चालणारच कसे.

निवेदन देतांना भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महादेव साळोखे व इतर पदाधिकारी
आपली हीच व्यथा आज अनेक निर्माते बऱ्याच ठिकाणी मांडतांना दिसत आहे.
ह्या गोष्टींचा भाजपा चित्रपट कामगार आघाडीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी विस्तृत चर्चा करून निवेदन सादर केले.
ह्या चर्चे मध्ये मुख्यतः मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त अनुदान देणे , सोई सुविधा मिळवून देणे , चांगली थिएटर व प्राइम टाइम उपलब्ध करवून देणे , अशा विषयांवर चर्चा होऊन निवेदन देण्यात आल्याचे भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन हा विषय पुढे नेण्याचे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले व निवेदन दाखल करून घेतले.
ह्या सर्व कामात भाजप चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज , सरचिटणीस सत्यवान गावडे , उपाध्यक्ष महादेव साळोखे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे सांगण्यात आले.