सद्गुरु विश्वनाथबाबा यांची तृतीय पुण्यतिथी साजरी !
वृत्तसंकलनः पत्रकार आत्माराम ढेकळे
पुणेः– येथील गंगाधाम परिसरातील ॐसाई विश्व नरेंद्र या ठिकाणी सद्गुरु विश्वनाथबाबा यांची तृतीय पुण्यतिथी विविध अध्यात्मिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सद्गुरु विश्वनाथबाबा यांच्या पुण्यतिथीचे तिसरे वर्ष या निमित्ताने गंगाधाम भागातील ॐसाई नरेंद्र या वास्तुच्या ठिकाणी मंदिर व प्रशस्त हाॕलमध्ये धार्मिक,अध्यात्मिक कार्यक्रमात भजन, गीत गायन संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने प्रसिध्द गायक व मृदंगवादक अखिलेशकुमार शुक्ला (पंडीत) यांनी भावपुर्ण भजन ,गीत गायन सादर केले. बनारसचे शिवसहाय सिंह या भजनी गायकानेही सुमधुर आवाजात भजन सादर केले.या गीत गायनमध्ये प्रामुख्याने “वो मेरी माँ ,मै तेरा लाडला ” या गीत गायनाने या गायकवृंदानी भाविकांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी श्रीमती श्रीकँवर उर्फ बेबीबाई या मातेने प्रभावित होऊन यांना प्रेमपुर्वक आशिर्वाद दिले.यामुळे गायक भारावुन गेले.
या कार्यक्रमात साई भजन,सद्गुरु विश्वनाथबाबा यांचे भजन गीत सादर केले.आॕर्गन (किबोर्ड) वर आधुनिक संगीताची साथ सुरजखान यांनी अत्यंत उत्कृष्ट दिली.तर प्रशस्त सभागृहात सद्गुरुंच्या पालखीची मिरवणुक काढण्यात आली.याप्रसंगी भाविक भक्तांनी सहभाग घेतला.
सर्व उपस्थित भाविकांना गुरु संतोषजी रांका बाबा व गुरुमाऊली सौ.नीताजी रांका यांनी आशिर्वाद दिले.
सकाळ ,संध्याकाळ या दोन्ही वेळेस पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेवटी महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.
—————————————————-
जाहिरात