भारतीय जलविश्वात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान :-
“वक्ते नंदकुमार वडनेरे”
“ सन्माननीय व्यासपीठ , सर्व अभियंते मित्र , त्यांचे कुटुंबीय यांचे मी स्वागत करतो . आज आपल्या स्वर्गस्थ अभियंताचे स्मरण , जागरण व कृतज्ञता व्यक्त करणेसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत . तीन वर्षापासून असा स्तुत्य कार्यक्रम आपले अभियंत्र मित्रचे संपादक श्री . कमलकांत वडेलकर हे करत आहेत . बहुतेक सर्व कार्यक्रमास मी आवर्जून हजेरी लावत असतो . कारण तो खरोखरच एक अनन्यसाधारण सेवाव्रती अभियंत्यांचा मित्र आहे . कोविड काळात आपल्या अभियंता वर्गमधील बरीच मित्रमंडळी आपल्यातून अचानक निघून गेली . काही मंडळी वयपरत्वे मृत्यू पावली . कोविड महामारी इतकी भयंकर होती की कोविडग्रस्तांना कोणीही म्हणजे आईवडील , बहिणभाऊ , मुले , मित्रमंडळी कोणीही शेवटपर्यंत भेटू शकली नाहीत . आमच्या मित्राने ही खदखद बोलून दाखविली . म्हणाला की ज्या अभियंता मित्रांनी अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहेत त्यांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही आणि म्हणून कौविड ओसरल्यावर मागील दोन वर्षापासून तेथे कर माझे जुळती ” हा कार्यक्रम अभियंता वर्ग व कुटुंबीयांसमवेत ते घडवून आणत आहेत . त्यांचे मनाप्रसून मी अभिनंदन करतो .
हा कार्यक्रम पुणे येथील सिंचन भवन मध्ये मागील वर्षी झाला होता . त्यावेळेस अगदी सर विश्वेश्वरैय्या यांच्यापासून तत्कालीन निवर्तलेल्या जवळपास ६०-६५ अभियंत्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला होता . त्यावेळेस २०-२२ स्वर्गवासी ज्येष्ठ अभियंत्यांविषयीच्या माझ्या आठवणी सांगतांना मन भरुन आले होते . मागील आठवडयात कमलकान्त माझ्याकडे आले होते . म्हणाले की ” २०२२ मधील कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम ते ठाणे , कल्याण , डोबिंवली व नवी मुंबईसाठी ऐरोली येथे डॉ . आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक परिसरात घेण्याचे ठरवित आहे आणि ह्या कार्यक्रमास मी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून निश्चित यावे असे निमंत्रण देत आहे , नाही म्हणू नका ” उत्साहाने असेही म्हणाले की , महाराष्ट्रात सर्व विभागीय क्षेत्रात भविष्यात असे कृतज्ञता सोहळे आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे . खरोखरच त्यांच्याविषयी माझे प्रेम व आदर द्विगुणित झाला . असे कार्यक्रम राबवितांना एकखांबी तंबू सारखे कार्य करणे , सर्व अभियंते , त्यांचे कुटूंबिय व इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळींनाही व्यासपीठावर आणणे व अभियंता वर्गाचे योगदान सर्वदूर पसरविण्याचे काम साधे नसते पण कमलकान्त अशी कार्ये आनंदाने करतो व कार्ये सिध्दीस जाईपर्यंत राबत असते . म्हणूनच माझ्या मते तो अनन्यसाधारण आहे . आपणा सर्वातर्फे भी परत त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो . छान .. खूप टाळया पडल्या आहेत . प्रमुख वक्ते म्हणून एकूणच जलक्षेत्रातील विकासासंदर्भात कुठल्याही विषयात मी बोललो तरी चालेल अशी स्पष्टोक्ती त्याने दिल्यावर व अर्धापाऊण तास वेळ राखून ठेवत आहे असे सांगितल्यावर माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून एक घर करणारा जलविश्वासंदर्भातील विषय मी सखोल व विस्ताराने सांगू शकेल असा पक्का निग्रह केला . त्या विषयाचा माझा अभ्यास , लेखन व वाचन मागील वर्षापासून चालू होतेच . Ps मित्रांन्द्रे सर विश्वश्वरैय्या यांना आपण अभियांत्रिकी क्षेत्रातील गुरु म्हणतो .. किंवा पितामह म्हणतो . Father of Engineering ही उप्प्रधी देतो . त्यांचे कार्य महान होते . ते १०२ वर्षे जगले . त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रत जे योगदान दिले ते श्रेष्ठ आहे . मोठया प्रकल्पावारील स्वयंचलित दरवाजे असो किंवा कर्नाटक राज्यातील कृष्णराजसागर धरणाची निर्मिती असो किंवा आपल्या महाराष्ट्रातील सिंचनप्रणालीतील ब्लॉक पध्दती असो तसेच अनेक राज्यातील जलसिंचन / उर्जा प्रकल्पावरील त्यांचा अमोल सल्ला असो त्यांचे योगदान केवळ तत्कालीन प्रकल्प बांधणीसाठीच नव्हते तर भविष्यातील जलविकासाची पायाभरणीही त्यामुळे होऊ शकली . देशातील सर्वोच्च पद्मपुरस्कारासह व अत्युच्च भारतरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला .
तद्नंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात बरेचसे अभियंते होऊन गेले ज्यांनी भारतीय जनतेला पिण्याच्या पाण्याची , सिंचनाची , उर्जेची व बहूपयोगी इतर s सुविधा उपलब्ध करुन देण्याचे बहुमोल कार्य केले आहे . त्यांनाही आपण श्रध्दांजली अर्पण करु . आज मी न भूतो न भविष्यती अशा थोर व्यक्तिविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जे अभियंता नव्हते पण कुशल समाजकारणी , राजकारणी , तत्ववेत्ते होते आणि आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून गौरविले गेलेले आणि ज्यांनी एकूणच पाण्याचे महत्व ओळखून आपल्या देशात प्रथमच जलक्रांती घडवून आणली अशा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय जलविश्वातील योगदानाविषयी दोन शब्द बोलणार आहे . त्यासंदर्भात फारच कमी अभियंत्यांना किंबहूना हातावर गोजता येईल एवढयाच वाचकांना माहिती अस्वी .. अर्थात बराच कालावधी लोटला असूनही ती पुढे आलेलीच नसावी .
सांगायचे झाले तर मी सुध्दा म्प्रगील पाच दशकापासून सिंचन क्षेत्रात कार्य करत आहे आणि निवृत्तीनंतरही जलक्षेत्रातील विविध प्रणालींचे अध्ययन करत आहे. पण केवळ २-३ वर्षापासून या संदर्भात काही माहिती वाचनात आल्यावरच एकूण योगदानाची महती पटली . जलसिंचन / उर्जा / दळणवळण ह्या अतिमहत्वाच्या क्षेत्राचा विकास झाल्यामुळेच आज आपण सुखी जीवन जगत आहोत . जलसंपदा खात्यात धरणांचे संकल्पन / बांधकाम / व्यवस्थापनादी कार्ये जवळपास ३४ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्तीचे काळात वरील क्षेत्रात कसा कसा विकास होत गेला , एकूणच कुठली यंत्रणा स्वातंत्र्यपूर्व / स्वातंत्र्योत्तर काळात काम करत होती , भारतीयांना हमीचे पाणी उपलब्ध करणेस्तव नेमके कुठले धोरण ब्रिटिशांनी आपणास देऊ केले व हृयांत तत्कालीन कोण कोण भारतीय धोरणकर्ते सहभागी झाले होते तसेच त्यावेळेसची प्रांतव्यवस्था / मध्यवर्ती सरकारमधील समन्वय कसा साधला गेला हारविषयी नेहमीच जिज्ञासा निर्माण होत असे .
थोडक्यात जलविकासाचे शास्त्र विकसित कसे करो होत गेले ह्याविषयी नेहगीच मनात कुतुहल जागत होते . म्हणून ब्रिटिश राजवटीतील स्वातंत्र्यपूर्व काळातील काही वर्षे तसेच स्वातंत्र्योत्तर नजीकच्या काळातील काही वर्षे जलक्षेत्रातील विकास्त्रसंदर्भात माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला . त्याविषयी बरेच लेखनसाहित्य , घटना , प्रथितयश अभियंत्यांचे तत्कालीन लेख व मुख्यत्वे मध्यवर्ती सरकारने जलसिंचन आयोगाचे माध्यमातून प्रस्तृत केलेली प्रशासकीय व अभियांत्रिकी माहिती / विश्लेषण / संशोधनादि पत्रव्यवहार वाचनात आला .
त्यातुनच खऱ्या अर्थाने डॉ . आंबेडकर आणि त्यांचे जलक्षेत्रातील योगदान किंबहूना वरदान उलगडले . महामानव का म्हणतात . प्रचिती आली . अभियंत्याचे प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांना आज श्रध्दांजली देऊ या .. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या ह्या पवित्र स्मारकात .. Ps आज बाबासाहेबांची ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून . ते एक अत्यंत हुषार प्रगल्भ कायदेतज्ञ होते व प्रथितयश लेखक म्हणून प्रसिद्धी पावलेले राजकारणी व सम्माजकारणी व्यक्तिमत्व होते . या व्यतिरिक्त अत्याचारित्यांचे पाठीराखे होते आणि महत्त्वाचे म्हणजे एक बहुक्षेत्री विद्वान म्हणून इंग्रजांनी व जगातील बऱ्याच देशांनी त्यांचा गौरव केलेला आहे . भारत देशातील संपूर्ण आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक , अध्यात्मिक व महत्त्वाचे म्हणजे अभियांत्रिकी विश्वातील क्षेत्रांचा त्यांचा उत्तम अभ्यास होता .
भारतासारख्या विशाल देशातील सर्व प्रांताचे जीवनाविषयक प्रश्न त्यांनी हाताळले त्याचा विचारपूर्वक अभ्यास केला . त्यांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर प्रत्येक ज्वलंत विषयांतील त्यांचा विस्तारित दृष्टिकोन , सखोल विश्लेषण , तर्कसंगत समाधान आणि मुख्य म्हणजे मानवावरील श्रद्धा आणि त्यासोबतच सर्व देशबंधूंना न्याय , स्वातंत्र्य , समता व बंधुभावाचे हक्क मिळणेसाठीची त्यांची आंतरिक तळमळ अन् त्यासंदर्भात मांडलेली आग्रही भूमिका . त्यांचे अजूनही एक व्यक्तीवैशिष्ट्य म्हणजे दिलेल्या कुठल्याही कार्यात झोकून देऊन उद्देश प्राप्ती करून घेणे हे होय . एखाद्या कमांडोसारखं त्या विषयाच्या मुळात शिरून प्रश्नाची सोडवणूक करण्यावर त्यांचा भर होता . ब्रिटिश सरकार किंवा आपले नव्याने आलेल्या सरकारने जी जी कार्ये त्यांच्यावर सोपविली त्यात कार्यसिद्धी साधण्यापर्यंत ते कार्यमग्न असत . भारतीय घटनेविषयीच बघा ना .. खरं म्हणजे सबनीस साहेबांचा बाबासाहेबांविषयी मोठा अभ्यास आहे त्याविषयी मी विस्तृतपणे बोलणे औचित्यपूर्ण ठरणार नाही . तथापि हे लक्षात घेतले पाहिजे की जगातील भारतासारख्या विशाल देशाची सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना विविध प्रांता मधील परिस्थिती , भौगोलिक विविधता , निरनिराळ्या भाषा , चालीरीती , अपेक्षा आणि तेथील प्रश्न लक्षात घेऊन त्याचा सखोल अभ्यास करून आणि सर्वसमावेशक दूरदर्शी धोरणाची आखणी करण्यासारखे महान कार्य करणारी निर्विवाद व्यक्ती म्हणजे बाबासाहेबच होते . हे आज जगातील सर्व प्रगत राष्ट्रांना माहीत असून त्याचा सार्थ गौरव त्या देशात तर झाला आहेच व भारतात देखील तत्कालीन राष्ट्रपती व पंतप्रधानांनी मुक्त कंठाने बाबासाहेबांची स्तुती केली व कृतज्ञता ही दर्शवली आहे .
राष्ट्रपती आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉ . राजेंद्रपसाद काय म्हणतात बघा . ” Sitting in the chair and watching the proceedings from day to day . I have realized as nobody else could have with what zeal and devotion the members of the Drafting Committee and especially its Chairman Dr. Ambedkar in spite of his indifferent health have worked . We would have never made a decision which was or could be ever so right as when we put him on the Drafting Committee and made him its Chairman . He has not only justified his selection but has added luster to the work which he has done Ps दोन तीन हजार हरकती , प्रश्न हाताळतांना त्यांनी सर्व प्रांत ( राज्ये ) आणि केंद्र सरकारातील सर्व प्रशासकीय आणि राजकीय व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करुन अथक प्रयत्न करुन आणि मुख्य म्हणजे सर्वाशी समन्वय साधून प्रश्नोत्तरातून सुयोग्य , कार्यक्षम आणि लवचिकता असणारी घटना , मसूदा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने संसदीय सभागृहात मांडून मंजूर करवून घेतली . हया त्यांच्या कार्यप्रवणतेला भारतातच नव्हे तर जगातही तोड नसावी .. त्यांना आपला नम्र प्रणाम . आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारताचे संविधान ( घटना ) हे जगातील सर्वात विशाल लिखित संविधान असून भारत देशाचा सर्वोच्च दस्तावेज आहे . हे संविधान पूर्णपणे लोकहितार्थ व नागरिकांच्या सर्वकष विकासासाठी वचनबद्ध असून नागरी जीवनाच्या जवळपास सर्वच अंगांना ( क्षेत्रांना ) स्पर्श करते . मानवी हक्काची सुरक्षा तर करतेच तर संविधानाच्या माध्यमातून भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करण्याचे अतिमहत्त्वाचे महान कार्यही करत आहे . देशातील सर्व धर्म , पंथ , जाती , भाषा , प्रदेश हया सर्व बाबींना समान वागणूक घटनेत दिसून येते . कालापरत्चे काही बदलही ( लवचिकता ) या घटनेत अंतर्भूत आहेत . जवळपास ३ ९ ५ कलमे , १२ परिशिष्टे आणि सुमारे १०० सुधारणांच्या विवरणासह ही घटना भारतातील व्यवस्था स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत व पुढेही सक्षमरित्या चालविण्यासाठी कटिबद्ध आहे . २ वर्ष , ११ महिने व १७ दिवस संविधान निर्मितीचे कार्य अहोरात्र चालू होते . हया संविधानात आपला जलक्षेत्राचा विषय देखील अंतर्भूत आहेत . पुढील भागात त्याचा परामर्श घेऊ.
डॉ . आंबेडकरांनी ( जन्म १८ ९ १ मृत्यु १ ९ ५६ ) भारतीय जलविश्ववत केलेले कार्य समजून घेण्यासाठी सन १ ९३०-१९ ४० सालातील काही घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे . त्यावेळेस अर्थातच ब्रिटीशांचे सरकार होते . तत्कालीन काळात भारतीय नेत्यांकडून ( ज्यात बाबासाहेबांनीही भाग घेतला होता ) भारतात घटनात्मक सुधारणांची मागणी वाढत होती . कारण भारतात व्यवस्थापन राबविणेसाठी ब्रिटीश घटना वा अन्य कोणत्याही संविधानाचा उपयोग झालाच नसता .
पहिल्या महायुध्दात भारताने ब्रिटनला दिलेल्या पार्टिब्यामूळे ब्रिटनला त्यांच्या स्वतःच्या देशाच्या प्रशासनात अधिक भारतीयांचा समावेश करण्याची गरज असल्याचे मान्यता करण्यात मदतच झाली हे बरेच झाले . हया १ ९ ३५ कायदयाने केंद्र आणि प्रांतांमध्ये अधिकाराची विभागणी मुख्यतः केली गेली हा कायदा सायमन कमिशन , गोलमेज परिषद , १ ९ ३३ मधील श्वेतपत्रिका व संयुक्त समित्यांच्या अहवालाच्या आधारे बनविण्यात आला . आंबेडकर कायदेतज्ञ असल्यामुळे हया सर्व बाबींवर लक्ष ठेवून असत . एकूणच भारतीयांना अपेक्षित असलेली प्रांतीय स्वातंत्रता मिळाली व राज्यपालांतर्गत प्रांताना विधीमंडळाद्वारे काही खास अधिकारही प्राप्त झाले . निवडणूकांचे अधिकार मिळाले . त्याचबरोबर राज्यातील निसर्ग संपत्तीचा उपयोग घेणेस्तव विविध प्रकल्प राबविण्याचे अधिकारही प्राप्त झाले . येथे बरेच काही सांगता येईल पण महत्वाचे सांगायचे म्हणजे लोकसेवा आयोग , रेल्वे , रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती केंद्र स्तरावरही केली गेली . राज्यस्तरावरील पाण्याविषयक भांडणे ( Interference with water supplies ) ही महत्वाची कलमे ( कलम १३०-१३५ ) घालण्यात आली . मात्र या कलमांद्वारे पाणी तंटा संदर्भात पूर्णपणे परिम्पर्जन होणे कठिण होते . कारण स्वतः केंद्र स्तरावर तंटा सोडविण्यासाठी ठोस तरतूद नव्हती . आंबेडकरांनी हया विषयात स्वतः लक्ष घालून राज्यांतर्गत पाणी वापराविषयक १ ९ ३५ कायदयात सुधारणा घडवून आणली आणि भारतीय घटनेतील कलम २६२ प्रमाणे आंतरराज्यीय पाणी तंटा लवाद प्राधिकरण ( Interstate water dispute tribunal ) याची निर्मिती करून भारतासारख्या विशाल देशातील मोठमोठया आंतरराज्यीय नदयामधील पाणी वापरातील तंटे कायदयाने हाताळून संबंधित राज्यांना त्यांच्या त्यांच्या पाणी हक्काचे व्यासपीठ तय्पर करुन दिले . ही एक खूप मोठी उपलब्धी जलक्षेत्रात डॉ . आंबेडकरांनी आपल्या भारतीय घटनेद्वारे निर्माण करुन दिली आहे . त्यासाठी “ १ ९ ५६ आंतरराज्यीय प्रणी तंटा कायदा ” [ 1956 Interstate water dispute Act ( Act 1956 ISWD Act ) ] निर्माण केला . भविष्यामध्ये जसाजसा पाणी वापर वाढल्यामूळे विकास होत जाईल तसातसा पाणी युध्दातही जोर वाढीस लागेल हे बाबासाहेबांनी ताडले होते . म्हणूनच त्यावरील सर्वसंमत कायदेशीर सुनावणी करुन न्याय्य पध्दतीने राज्यांतर्गत पाणी वाटपाचे सूत्र अवलंविणे सोईस्कर होऊ शकले आहे . आपल्या महाराष्ट्रातच बघा ना . कृष्णा पाणी तंटा लवाद , गोदावरी पाणी तंटा लवाद , नर्मदा पाणी तंटा लवाद , महानदी पाणी तंटा लवाद तसेच मांडवी नदीवरील लवाद पूर्ण झाले / कार्यरत आहेत . इतर राज्यात कावेरी पाणी तंटा लवाद , महानदी पाणी तंटा लवादांतर्गत पाणी प्रश्नांची सोडवणूक होत आहे . ” दुसरे महायुध्द झाले . १ ९ ४० साल उजाडले . या महायुध्दानंतर भारतीय पुर्नरचना करण्याचा प्रयत्न सुरु झाला . महायुध्दानंतर भारतीयांची एकूणच आर्थिक , सामाजिक आणि कुटूंबव्यवस्था बऱ्यापैकी कोलमडून पडली होती . परिस्थिती हालाखीच्ी झाली होती . म्हणून ब्रिटीश सरकारला सगळ्या प्रांतांना एकत्र करून भारतीय पुर्नरचना समिती नेमणे क्रमप्राप्त ठरले . त्याप्रमाणे भारतीय पुर्नरचना समिती ( Reconstruction Committee_ Rcc ) नेमली गेली . हया समितीमध्ये मध्यवर्ती मंत्रीमंडळामधील संबंधित मंत्री होते . व्हॉईसरॉय हे अध्यक्ष होते . हया समितीत वेगवेगळ्या धोरण समित्या नेमण्यात आल्या . त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील केंद्रिय मंत्री , प्रांतातील प्रतिनिधी ज्यांना व्यापार , उदयोगधंदे व आर्थिक व्यवहारातील भारततील चांगली माहिती होती . हया समितीबरोबरच दूसरी कार्यालयीन समितीही नेमली गेली . ज्यामध्ये केंद्र , प्रांत व राज्यामधील सचिव कार्यरत होते . हया दोन्ही समित्यांनी विविध क्षेत्रातील माहिती / धोरणे ही मुख्य पुर्नरचना समितीला सादर केल्यावर शेवटी व्हॉईसरॉयचे कार्यालयातून अंतिम घोरणे मंजूर करण्याची योजना होती . येथे डॉ . बाबासाहेबांचे योगदान मोठे ठरले . बाबासाहेब ब्रिटीश राजवटीत १ ९ ४२ सालापासून मजूर मंत्री म्हणून कार्यरत तर होतेच पण त्यांचे कर्तृत्व लक्षात घेता त्यांचा व्हॉईसरॉय कार्यकारी मंडळाचे सभासद म्हणूनही समावेश करण्यात आलेला होता . येथूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे जलविश्वातील योगदानास सुरुवात झाली असे म्हणता येईल . प्रत्येक धोरण समितीचे अहवाल त्यांनी स्वतः तपासले व एकूणच काही महत्वाच्या क्षेत्रातील धोरण नियोजन सक्षमरित्या राबविण्यासाठी मध्यवर्ती सरकारने पुढाकार घेवून प्रांताचा सहभाग साधून केंद्रस्तरावर गठित करण्याचा आग्रह धरला . अशी महत्वाची क्षेत्रे म्हणजे सिंचन , उर्जा , उदयोगधंदे , दळणवळण व कृषी ही होती . त्यापैकी अतिमहत्वाची सिंचन व उर्जा क्षेत्रे बाबासाहेब यांच्या मजूर खात्याशी जोडण्यात आली .. Ps दुसऱ्या महायुध्दानंतर आर्थिक विकासाचे व्यापक धोरण आणि सिंचन व उर्जा या विषयावर तपशिलवार धोरण तयार करणेसाठी बाबास्हेबांनी पुढाकार घेतला .
१ ९ ३५ च्या कायद्यानुसार मजूर विभागाने ( श्रम विभागाही म्हणतात ) सिंचन व उर्जा ( वीज ) विकासासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी कार्यान्वीत करण्याचे ठरविले . बाबासाहेबांनी स्वतः प्रत्येक विषय हाताळले होते . त्यामध्ये १ ) एकापेक्षा दोन राज्यात वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे . २ ) राज्यांमधील नद्यांवर पाणी व जलविद्युत उर्जा संपत्ती निर्माण करणे आणि ३ ) शासकीय व तांत्रिक विकास साधणेसाठी राष्ट्रीय सिंचन धोरण कसे असावे या गोष्टींचा समावेश होता . डॉ . आंबेडकरांनी पाणी व वीज हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत आणण्याचे फार मोठे कार्य केले आहे . त्याकरिता वेगवेगळ्या कमिट्या व कॉन्फरंसेस् मध्ये स्वतःचे आग्रही मत माडले . प्रांत ( स्टेट ) व मध्यवर्ती सरकार एकत्रितरित्याच भारतातील निसर्गसंपत्तीचा वापर देशासाठी घडवून आणू शकेल अन्यथा सक्षमरित्या विकास होऊ शकणार नाही असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते . त्याप्रित्यर्थ त्यांनी जगामध्ये जो विकास त्यांच्या मध्यवर्ती सरकारच्या पुढाकारानेच झालेला आहे हे सप्रमाण प्रतिपादन केले त्याविषयी त्याच्या जलधोरणात निर्वाळा दिलेला होता तो खालीलप्रमाणे होय . ” It has been the experience of other countries with federal constitutions , the constituent States of which enjoy a measure of autonomy far greater than that enjoyed by the Provinces in India , that for the purpose of economic development they have to come together and formulate a common policy in the general interest of the country as a whole . ” जलसिंचन व व्रज विषयावरील धोरण ( policy ) ठरवितांन्त्र बाबासाहेबांनी प्रांकडून अहवाल मागवून त्यावर केंद्राने अभ्यास करणे या पर्यायापेक्षा केंद्रस्तरावरच धोरण ठरवून प्रातांचा सहभाग साधण्याचा महत्वाचा पर्याय निवडला . हे काम जिकिरीचे होते पण बाबासाहेबांनी त्यांच्या निवडक अधिकाऱ्यांना हाताशी धरून व प्रसंगी सल्लागाराची मदत घेऊन केंद्रस्तरावरून जलधोरणाची मांडणी केली . त्यामुळे एकूणच वेळापव्यय झाला नाही व बाबासाहेबांच्या अभ्यासपूर्ण जलधोरणाचा ठसाही दिशादर्शक ठरला . सदर जलधोरण पुनर्रचना समिती व केंद्रारा एकाचवेळेरा पाठवून बाबासाहेबांनी पुढील तीन महत्वाचे विषय जलधोरणात समाविष्ट केले . १ ) जलसिंचन , जलमार्ग व जलनिस्स्प्ररण ( Irrigation , Waterways & Drainage ) २ ) उर्जा विकास ( Developrment of Electric Power ) आणि ३ ) अंतर्देशीय जलवाहतूक ( Inland Water Transport ) Ps य वरील धोरणात्मक तिन्हीही विषयाची त्यांनी विस्तृतपणे माहिती केंद्र सरकारला दिली व एकूणच भारतातील निसर्गसंपत्तीचा इष्टतम वापर समृध्दी होणेस्तव केंद्र स्तरावरुन पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले . प्रांतांमधील त्यांच्या त्यांच्या स्तरावरील विकास केंद्र शासनाच्या मदतीने वर्धित करण्याचे सूत्र त्यांनी पटवून दिले . हे कार्य केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमूळेच होऊ शकले आहे . बाबासाहेबांनी सिंचन व वीजविषयी त्यांनी सुचविलेल्या धोरणात्मक विधानासंदर्भात ( Policy Statement ) स्पष्ट खुलासा करुन दिलेला आहे . सिंचनाचा विकास झाल्यामुळे उद्योगधंदे आणि कृषिक्षेत्रात आमुलाग्र क्रांती होईल अन्नधान्यात देश स्वतंत्र तर होईलच पण देशाचे उत्पन्न वाढीस लागून मोठ्या नद्यावरील धरणांमुळे महापूरावर योग्य नियंत्रण करता येऊ शकेल . दरडोई उत्पन्न वाढेल . तसेच मध्यम व लघुपाटबंधारे तलाव निर्मितीमुळे स्थानिक स्तरावरील क्षेत्रात समृध्दीचे पीक फोफावणार आहे . कालव्यांच्या जाळ्यांमुळे आसपासच्या जमीनीत आर्द्रता टिकून राहील व एकूणच पिण्यासाठी , सिंचनासाठी उद्योगधंद्यांसाठी पाण्याचा इष्टतम वापर होणेस मदत होईल . तसेच भूगर्भातील पाणीसाठयाचे प्रमाणही वाढल्यामुळे संयुक्त पाणीवापर होत राहील त्यामुळे दुष्काळी प्रदेशातही पाण्याची माफक उपलब्धी होणार आहे . या व्यतिरिक्त अजून बऱ्याच विकासाच्या वाटा मिळत राहतील असे त्यांनी विधानात समाविष्ट केले आहे . एकूणच वरील क्षेत्राचा विकास घडवून आणणेस्तव प्रांतांनी त्यांच्या त्यांच्या भागातील प्रकल्प राबविण्याचे अग्रक्रमाने धोरण ठेवावे व राबवावे . मध्यवर्ती सरकार गरजेप्रमाणे सर्व प्रकारची साधनसामग्री देण्यात प्रयत्नशील राहील तसेच तांत्रिक पाठबळही उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रांतांमधील काही महत्वाचे प्रकल्पांवर व आंतरराज्यीय प्रकल्पांवर आर्थिक मदतही दिली जाईल .
मध्यवर्ती सरकारकडे प्रांतांनीही विहित नमुन्यात प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविल्यास तपासणी करून सदर प्रकल्पांना मंजूरी देण्याची जबाबदारी मध्यवर्ती सरकार घेईल . आस्तित्वातील मध्यवर्ती सिंचन बोर्ड ( Central Board of Irrigation ) याची पुनर्रचना करण्यांत येईल . असे प्रतिपादन बाबासाहेबांनी केले आहे . वीजनिर्मितीविषयी त्यांनी त्यांच्या धोरण विधानात खुलासा केला की देशातील डळमळीत झालेली वीजयंत्रणा सुसज्ज करावीच लागेल . विविध प्रकल्प राबवून वीज उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी लागणारी सर्व साहित्यसामुग्री व त्यासाठी वाढीव प्रशासकीय यंत्रणा व हमी क्षेत्रे ( Electricity Development Undertakings ) यामध्ये सार्वत्रिक नियोजन करुन भरीव वाढ करावी लागेल . एकूण मध्यवर्ती सरकारचे अखत्यारीतील मध्यवर्ती तांत्रिक वीज मंडळ ( Central Technical Power Board ) निर्माण करुन देशातील सर्व प्रांतामधील वीजनिर्मिती व वितरणावर प्रशासकीय नियंत्रण ठेवावे लागेल वीजेची गरज तणा – या उद्योगधंद्यानाही सवलती देऊन वीजेचा इष्टतम व फायदेयुक्त वापर वाढविण्याची गरज आहे , त्याचप्रमाणे भारतीय अभियंत्यांना परदेशात पाठवून एकूणच प्रशासनिक , आर्थिक व तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे असेल . अंतर्देशीय जलवाहतूक सद्यःस्थितीत चांगली नसल्यामुळे आणि मुख्यत्वे रेल्वेला पर्याय नसल्यामुळे या फायदेशीर उपलब्धीचा व्यवहारात उपयोग करुन घेणे अवघड झाले आहे . हा विषय जरी प्रांताधीन असला तरी मध्यवर्ती सरकाराच्या माध्यमातून जलवाहतूक विकास साधण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल . त्यासाठी संबंधित नद्यांना जलवाहतूक पूरक बनविण्यात येईल .
तसेच जेथे शक्य आहे तेथे आस्तित्वातील कालवे वापरण्यात येतील . काही ठराविक जागांवर नव्याने कृत्रिम जलमार्ग निर्माण कले जातील तसेच मोठ्या शक्तीच्या बोटी / जहाजे विकत घेता येईल . जलमार्ग / रेल्वेमार्ग / रस्ते याचा एकात्मिक वापर करण्याची प्रणाली फायदेशीर राहू शकेल . मित्रांनो , या महानवाविषयी , जलनायकाविषयी , जलमहर्षी संदर्भात जेवढे बोलावे ते कमीच ठरेल . बोलण्याच्या ओघात त्यांच्या जलनेतृत्वाचे सर्व कंगोरे आपणासमोर मांडताना मला आता वेळ अपुरा पडत आहे हे लक्षात घेऊन तसेच डॉ . सबनीस यांचे अर्थपूर्ण भाषणही ऐकायचे आहे म्हणून मी सरळ त्यांच्या निवडक , पुरोगामी व भविष्यात जलक्षेत्रात क्रांती घडविलेल्या प्रमुख योगदानाविषयी थोडेफार बोलणार आहे . त्यांच्या जीवनातील सन १ ९ ४० ते १ ९ ५६ हा सोळा वर्षाचा काळ आपणासाठी सुवर्णकाळ ठरला .
डॉ . आंबेडकरांचे अमूल्य योगदान अगदी थोड्या शब्दात मांडतोय . १ ) भारतीय नदीखोऱ्यामधील निसर्गदत्त जलसंपत्तीचा इष्टतम , बहुपयोगी वापर करून तांत्रिक ज्ञानाच्या पाठबळावर संपूर्ण देशाचा सार्वत्रिक विकास करणेसाठी जीवनावश्यक प्रमुख गरज असलेल्या जल व ऊर्जा क्षेत्रासाठी सर्वांगोपयोगी व सर्वसमावेशक भारतीय जलधोरण ( All India Water Policy ) प्रथमच त्यांनी तयार केली . २ ) ब्रिटिश राजवटीत अथक प्रयत्नांद्वारे तत्कालीन व्हाईसरॉयच्या संसदीय मंडळाच्या विविध प्रांतातील तज्ञांची मदत घेऊन संपूर्ण भारत देशातील जलसिंचन / जलवाहतूक क्षेत्रातील विकास साधणेस्तव व प्रत्यक्षात प्रकल्प बांधणीचे कामात गरज असलेल्या प्रशासनिक , तांत्रिक व आर्थिक अशा मध्यवर्ती जलवाहतूक , सिंचन व जलमार्ग आयोग ( Central Waterways . Irrigation & Navigation Commission ) स्थापन केला . ज्यांचे आता काही कालांतराने मध्यवर्ती सिंचन आयोग [ Central Water Commission ( CWC ) ] व मध्यवर्ती वीज मंडळ ” [ Central Electricity Authority ( CEA ] असे रूपांतर झाले आहे . या दोन्ही क्षेत्रातील सर्व प्रकारची प्रशासनिक यंत्रणा व तांत्रिक पाठबळाचा लाभ सुमारे पन्नास वर्षापासून आजतागायत सर्व राज्यातील सरकारी / निमसरकारी यंत्रणेस मिळत आहे . म्हणूनच आज सर्व भारतीयांना सिंचन / वीज / वाहतूक क्षेत्रातील पायाभूत बांधकामांद्वारे विकास साधणेची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे . सुरुवातीस नकारघंटा दर्शविणाऱ्या ब्रिटिश सरकारला बाबासाहेबांच्या अथक पाठपुराव्यामुळे जलविकासाचे मार्ग खऱ्या अर्थाने खुले करण्याच्या मौलिक आयोगाची स्थापना मंजूर करावी लागली हे लक्षात घ्यावेच लागेल . प्रसंगावशात नमूद करतो की भारत देशात आतापर्यंत सुमारे ५३०० मोठी धरणे बांधली गेली असून एकट्या महाराष्ट्रात सर्व राज्यांहून जास्त म्हणजे २३५४ धरणे बांधली गेली आहेत . भविष्यातील सर्व धरणांची बांधकामे होतील त्यावेळ भारतीय धरणाच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात जवळपास अर्धी धरणे असतील . हे यश महामानवाचे असेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही . ३ ) भारत देशात प्रथमच ” नदी खोरे विकास संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली व नदीखोरे विकास यंत्रणा [ River Vallay Organization किंवा River Basin Organizations ( RBO ) ] उदयास आल्या ज्यामुळे देशभरातील सर्व प्रांतात ( राज्यात ) नदीखोऱ्यामधील पाण्याचा सर्वकष , सक्षम व एकात्मिक विकास साधणे शक्य झाले आहे . मुख्य म्हणजे कायदेविषयक प्रश्नांचे निरसन होऊन संबंधित खोऱ्यामधील पाण्याच्या विविध गरजांचा एकत्रित अभ्यास करून सर्व प्रकारची जलउपलब्धी ( भूतलावरील व भूतला खालील ) लक्षात घेऊन मानवाच्या सर्व गरजा जसे की पिण्यासाठी , उद्योगधंद्यासाठी शेतीसाठी , वीजप्रकल्पांसाठी पर्यटनासाठी व इतर खोरेनिहाय सर्व प्रकारच्या गरजा भागविणे शक्य झाले . पूरनियंत्रणाचे कार्यही करता येऊ शकले . राज्यातील जिल्हानिहाय / तालुकानिहाय पाण्याची गरज समजू शकते पण खोरे म्हणून पाण्याची आवक अगदी उपखोरेनिहाय सुद्धा जलशास्त्राच्या ( Hydrology ) माध्यमातून अंदाजित करता येऊ शकते ज्यावर खऱ्या अर्थाने जलविकासाची मांडणी सुयोग्य रितीने करता येऊ शकते हे बाबासाहेबांनी तत्कालीन अभियंत्यांसमवेत वेळोवेळी झालेल्या चर्चा / सल्लामसलतीमधून समजून घेतले . नदीखोरे विकासासाठी कायदा संमत महामंडळ ( Corporation ) ची उभारणी शक्य झाल्यामुळे प्रशासन सोपे झाले . स्वायत्तता आली . योग्य ते अधिकार कॉर्पोरेशनला प्राप्त झाले . Special Purpose Vehicle : ( SPV ) निर्माण करून आर्थिक नियोजन करणे शक्य झाले . सरकारच्या आर्थिक मदतीबरोबर खोऱ्यातील सर्व लहानमोठे प्रकल्प राबविण्यासाठी बाजारातून निधी उभारणी शक्य झाली . बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीमुळे संपूर्ण भारतातील नदीखोऱ्यांमध्ये जलविकासाचे वारे फिरले . आज भारत देश अन्नधान्य / वीज क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे . सुरुवातीस मुख्यत्वे उत्तर / पुर्वेकडील नदीखोरे विकास यंत्रणा स्वातंत्र्यप्राप्तीच्या जवळपास निर्माण केल्या गेल्या तद्नंतर संपूर्ण भारतभर नदीखोरे विकास यंत्रणेचे जाळे पसरत गेले हे आपण बघत आहोत . एकाच मोठ्या नदीखोऱ्यातील समावेश असलेल्या विविध राज्यांनाही त्या त्या राज्यातील पाणीवापर अडवून आणणेसाठी कॉर्पोरेशनद्वारे जलविकास साधने शक्य झाले आहे .
आपल्या महाराष्ट्राविषयी सांगायचे झाले तर कृष्णा , गोदावरी , विदर्भातील खोरे , पश्चिमवाहिनी नद्या , तापी या नदीखोऱ्यांसाठी महामंडळे स्थापन झालेली आहेत . तद्वतच भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये नदीखोरे विकास यंत्रणा कॉर्पोरेशनच्या रूपात उभ्या राहून जलविकासाचे मौलिक कार्य करत आहे . तर मित्रांनो , या जलविकासाचे उगमस्थान बाबासाहेबांपासून सुरू होते हे म्हणावयास हरकत नसावी . 8 ) भारत देशात प्रथमच नदीखोरे प्रकल्प बहूउद्देशिय ( Multipurpose ) प्रणालीवर राबविण्यासाठी संकल्पना डॉ . आंबेडकरांनी धोरण म्हणून मांडली . नदीखोऱ्यातील उपलब्ध जलसंपत्ती व खोऱ्यातील बहूउद्देशिय विकास यांच्यात परस्परसंबंध आहेत . बाबासाहेबांच्या चाणाक्ष , विशाल व तर्कसंगत दृष्टीकोनातून आणि अनुभवातून त्यांना हे स्पष्टपणे उमजले होती की नदीखोऱ्याचा एकात्मिक विकास हा खाऱ्यातील जलसंपत्तीवर व तेथील शक्य असलेल्या इष्टतम विविधांगी वापरावर अवलंबून असतो म्हणून त्यांनी नदीखोरे विकासात आर्थिक विकास महत्वपूर्ण असल्यामुळे खोऱ्यातील जलसंपत्ती खऱ्या अर्थाने आर्थिक सुबत्ता लाभण्यासाठी विविध बहुअंगी / बहुउद्देशिय वापर प्रणालीचा अवलंब केवळ गरजेचाच नसून अनिवार्यच आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला . सन १ ९ ३५ च्या भारतीय घटनेत Water from any natural source fo supply ” संदर्भात कुठेही नदीखोरे वा पाणलोट क्षेत्र अश्या अभियांत्रिकी शब्दरचनेचा उल्लेख नव्हता . कारण तत्कालीन काळात नुकतेच अभियांत्रिकी शास्त्र सन १ ९ ३० पासून नुकतेच उदयास येत होते व पाण्याच्या उपलब्धी नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या खोऱ्यात / उपखोऱ्यातील नदयांवरच मापन केल्यावरच ( hydrologic unity ) मिळू शकतात हे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असावी . हया सर्व बाबी लक्षात घेवून बाबासाहेबांच्या अधिपत्याखालील तत्कालीन सिंचन व बीज विभागाने ( Irrigation & Power Department ) प्रथमच १ ९४५-४७ सालापासून नदीखोरे निहाय बहुउद्देशिय प्रकल्पांचे आराखडे बनविण्यास सुरुवात केली व त्या संदर्भातील संकल्पन / बांधकामाराही काही उत्तर / पूर्वेकडील जलप्रकल्पावर सुरुवात केली . अश्या प्रकल्पांना कॉर्पोरेशन स्थापून आर्थिक पाठबळही मिळवून दिले . शिवाय प्रकल्प उभारणीत उपभोक्त्यांचा ( apportionment ) आर्थिक बाटाही पाणीवापराचे प्रमाणात ठरविणे सुकर झाले . नामनिर्देश करावयाचा झाला तर ” दामोदर खोरे विकास महामंडळ ( DCV ) [ तत्कालीन बिहार / पश्चिम बंगाल ] म्हणून देता येईल . हा प्रकल्प केवळ बाबासाहेबांच्या सार्वत्रिक प्रयत्नातून साकार झालेला भारतातील पहिला नदीखोरे बहुउद्देशिय प्रकल्प ( Multipurpose River Valley Development Project ) होय . हया प्रकल्पाची मांडणी होत असतांना बाबासाहेबांनी दोन्ही प्रांतांना निक्षून प्रतिपादन केले होते की केवळ तत्कालीन लक्षात आलेली तुमची एखादी गरज / अपेक्षा व्यक्त न करता पाण्याचे एकूणच सर्वांगाने महत्व लक्षात घेवून सामंजस्याने खोऱ्यात जलसंपत्तीचा बहुअंगी / बहुउद्देशिय वापर घडवून आणण्याचे सूत्र मनी बाळगा व खोऱ्यातील जलसंपत्तीचा पुरेपूर वापर जसे की सिंचन , उदयोगधंदे , जलवाहतूक , पर्यटन , जलविदयुत च औष्णिक वीजनिर्मिती , खोऱ्यातर्गत भूजल धूप प्रतिबंध , मासेमारी व इतर शक्य असलेल्या कारणांसाठी घडवून आणण्याचा प्रयत्न करा . मित्रांनो , येथूनच पुढे संपूर्ण भारतात जवळपास सर्व नदीखोऱ्यांमध्ये बहूउद्देशिय प्रकल्पबांधणी सुरु झाली व जलक्षेत्रात एकूणच लक्षणिय प्रगति होऊ शकली .
डॉ . आंबेडकारांचा सिंहाचा वाटा आहे या उपलब्धीत हे निश्चित .. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने जलसंपत्तीचे रुपांतर आर्थिक उपलब्धीत झाले . ५ ) प्रांताप्रांतातील ( राज्याराज्यातील ) पाणीवार संदर्भातील तंटयांचा निर्णय आंतरराज्यीय पाणी वाटप लवाद ” [ Interstate Water Dispute Tribunal ] नेमून करणेसंदर्भात डॉ . आंबेडकरांचे जलविश्वातील फार मोठे योगदान आहे . त्यासाठी १ ९ ५६ आंतरराज्यीय पाणी तंटा लवाद कायदा ( १ ९ ५६ ISWD Act ) निर्माण केला गेला . पूर्वी भारतीय १ ९ ३५ कायदयात “ पाणीपुरठयातील हस्तक्षेप ( Interference in water supplies ) या १३०-१३५ कलमांमध्ये माफक सूचना उदृत केल्या होत्या . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रस्तावित केलेल्या भारतीय घटनेत त्यात अमूलाग्र बदल सूचवून कलम २६२ मध्ये वरीलप्रमाणे कायदेसंगत प्रणाली मंजूर केल्यानंतरच खऱ्या अर्थाने राज्याराज्यातील पाण्याच्या भांडणाचे समर्पक / न्याय निरसन / निर्णय करणे सुखकर झाले आहे . या लेखात सुरुवातीच्या काही भागात पाणी तंटा लवाद संदर्भात उहापोह केलेला असून बाबासाहेबांचे दुरदृष्टीचा भारतीय जलविश्वात अनन्यसाधारण विकास झाल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे येथे विस्ताराने जास्त सांगत नाही . सध्याच्या आधुनिक जगतात तद्वतच् पाण्यासाठी तिसरे युध्द होईल असे भाकित / तर्क बरेच ठिकाणी बोलले गेल्याचे आपण ऐकत आलेलो आहोत आणि हा अनुभव प्रत्यक्षात उतरल्याचेचे चित्र दिसून येत आहे . सर्वमान्य तोडगा काढल्याचे महान कार्य डॉ . आंबेडकरांनी केले आहे हे त्यांचे भारतीय जलविश्वासात अतिमहत्वाचे योगदान आहे .
भारत देशात प्रथमच नदीखोरे विकास संकल्पन / बहुउद्देशिय प्रकल्प / नदीखोरे विकास यंत्रणा ( महामंडळ ) या एकत्रित त्रिसूत्री प्रणालीद्वारे प्रत्यक्ष जलक्षेत्र विकासाची सुरुवात पूर्वोत्तर दामोदर , सोन आणि महानदी खोऱ्यात डॉ . आंबेडकरांच्या प्रेरणेतून / पाठबळाद्वारे झाली . ( Initiation of Important River Valley Projects namely Demodar Son & Mahanadi through Dr. Ambedakars sole inspiration ) डॉ . आंबेडकर हे नदीखो यातील बहुउद्देशिय प्रकल्प साकार करण्यात अग्रेसर ( Pioneer ) असे समाजकारणी , राजकारणी , देशभक्त होते हे त्यांच्या घटनानिर्मिती व विषेशरित्या जलक्षेत्रातील अमोल कार्यावरुन लक्षात येईल . बाबासाहेबांच्या अधिपत्याखालील भारतीय जलधोरणाची निर्मिती झाल्यावर व मुख्यत्वे मध्यवर्ती जलवाहतूक , सिंचन व जलमार्ग आयोगाची ( CWINC ) स्थापना झाल्यानंतर भारतात बऱ्याच ठिकाणी राज्यातून मोठे जलप्रकल्प राबविण्याची मागणी येऊ लागली . तत्कालीन काळात ( १ ९ ४२४६ ) राज्याराज्यात जसे की बिहार , पूर्व बंगाल , ओरिसा इ . ठिकाणी नदिखोऱ्यात विविध प्रश्न निर्माण झाले होते . तेथील दामोदर , सोन , महानदी खोऱ्यात बाबासाहेबांनी लक्ष घालावे अशी आग्रही मागणी येऊ लागली . अर्थातच डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः या विषयात स्वतः ला झोकून दिले व सुरुवातीस दामोदर खोऱ्यातील प्रश्नांना हात घातला . दामोदर नदी ही तत्कालीन बिहार राज्यात उगम पावते व बंगालमधील हुगळी नदीस येऊन मिळते . बिहारमधल्या तिच्या उंचसखल असलेल्या सुमारे २५० कि.मी. प्रवासात अतितीव्र वेगाने वाहतांना तेथील नदीपात्र / सभोवताली मोठ्या प्रमाणात खरवडले जाऊन जमिनीची धूप होते तर पुढील २५० किमी बंगालमधील राज्यात गाळ येऊन बसतो व महापुरांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित / आर्थिक हानी होते . दोन्ही राज्यांचे प्रश्नांचे निरसन करून समन्वय साधून एकत्रित प्रकल्प राबविण्याचे बाबासाहेबांनी धोरण तयार केले . सल्लामसलत केली .
तत्कालीन काळात मोठ्या प्रमाणात पूरप्रतिबंधक बांध ( Flood Protection ermbankments ) घालण्यात आले होते पण वेळोवेळी महापुराने ते फुटत असल्यामुळे तो पर्याय पूर्णनियंत्रणासाठी योग्य ठरत नाही असे बाबासाहेबांनी सुचविले . तसेच वेळोवेळी दोन्ही राज्यांच्या सुनावणीत ( Conferences ) संबंधित राज्यांना केवळ धूप होतेय / महापूर छळतात एवढेच मुद्दे मांडणे योग्य ठरेल तद्पेक्षा समन्वय साधून दामोदर नदीच्या जलसंपत्तीचे सर्वांग उपयोग करून घेण्याचे नियोजन करा असा मौलिक सल्ला बाबासाहेबांनी राज्यांना दिला . मजूर विभागातील त्यांच्या सिंचन व ऊर्जा विभागांतर्गत त्यांनी राज्यांना दिलेले विनंती वजा आदेश खालील प्रमाणे वाचनीय ठरतात . “ The issue before us is whether we should be content with damming the river for purpose of stopping the flood only or whether we should make it a multipurpose project so as to cover generation of electricity and supply of water for irrigation and navigation also and that it is to have the object of not only preventing flood in Damodar river but also . the object of irrigation . navigation and the production of electricity “
डॉ . आंबेडकरांनी दामोदर खोऱ्याची इथ्यंभूत माहिती गोळा केली होती . मागील सुमारे १०० वर्षापासून या नदीमुळे बव्हंशी नुकसानच होत राहिले म्हणून अश्रूची नदी ” म्हणूनच तिला संबोधले जाई . बऱ्याच समित्या नेमण्यात आल्या पण ठोस कुठलेही उत्तर सापडले नाही . १ ९ ४० मध्ये बंगाल समिती नेमली गेली . बऱ्याच कालावधीनंतर १ ९ ४४ मध्ये डॉ . आंबेडकरांना पाचारण करण्यात आले . त्यांनी स्वतः जबाबदारीने दोन्ही राज्यांना समन्वयाने एकत्रित आणून टेनेसी खोरे प्राधिकरण [ Tenesee Valley Authority ( TVA ) ] वर आधारित दामोदर खोरे विकास महामंडळाची ( Dvc ) निर्मिती केली . खोऱ्यामध्ये / उपखोऱ्यांमध्ये जसे की दामोदर ४ धरणे , बरकार -३ धरणे , कोणार -१ धरण अशी धरणे प्रस्तावित करून सन १ ९ ४४ साली या प्रकल्पास मान्यता मिळवून घेतली व दामोदर खोरे विकास महामंडळाचा अॅक्ट ( Bill ) स्वातंत्र्योत्तर म्हणजे १ ९ ४८ साली मंजूर करून घेतले . दामोदर खोऱ्यामध्ये ७.५ लक्ष हे . सिंचन ३५० मेगावॅट वीजनिर्मिती , १ कोटी जनतेस पिण्याचे पाणी , बोकारो प्रकल्पास पाणीपुरवठा , औष्णिक वीजकेंद्रास पाणीपुरवठा व इतरही बऱ्याच उपक्रमांना पाणी उपलब्ध करून मिळाले आहे . दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने DVC मधील कार्य सुरळीतपणे चालू होऊ शकले . एकूणच दामोदर खोरे प्रकल्पातील सर्व पायाभूत सुविधा ( धरणे , वीजगृहे इतर प्रकल्प ) १ ९ ४८ पासून १ ९ ५७ सालापर्यंत निर्माण केल्या गेल्या . त्यानिमित्ताने प्रकल्प पिडित्यांच्या प्रश्नातही बाबासाहेबांनी Land for Land संकल्पना सुचवली व पुनर्वसन धोरणहि आखून दिले . डॉ . आंबेडकर त्यांच्या उत्तरार्धात दामोदर खोऱ्यातील प्रगती बघत होतेच . दुर्दैवाने त्यांचे १ ९ ५६ साली दुखद निधन झाल्यामुळे सन १ ९ ५७ मधील प्रकल्पाचा राष्ट्रार्पण सोहळा मात्र ते बघू शकले नाही . मित्रांनो , सदरील दामोदर खोरे विकास प्रकल्पांची महत्त्वाची पुर्वार्धातील प्रशासनिक , आर्थिक व कायदेशीर कार्य बाबासाहेबांनी स्वतः हाताळली व शेवटपर्यंत प्रकल्पांचे बांधकामही ते जातीने बघत असत . आपल्या देशातील अगदी पहिल्याच आंतरराज्यीय दामोदर खोरे प्रकल्प त्यांनी राबवल्यानंतर सर्व राज्यांमध्ये त्यांना पाचारण करण्यात येत होते .. तदनंतर महानदी , सोन खोरेविकासातही त्यांनी लक्ष घातले . ओरिसामधील महानदीने महापुराचा कळस गाठला होता .
अगदी १८५८ साली पूर नियंत्रणावरील उपाययोजना सुचविण्यासाठी सर आर्थर कॉटन हयांची समिती नेमली होती . त्याचा सिंचन / वाहतूक विषय त्या निमित्ताने हाताळणे गरजेचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले होते . अर्थात तत्कालीन काळात अभियांत्रिकी क्षेत्र विकसित झाले नव्हती . नंतर १ ९ ३७ साली सर विश्वेश्वरय्या यांनी २ महत्त्वाचे अहवाल सादर केले होते . तथापि खऱ्या अर्थाने कुठलीच सक्षम कार्यवाही होऊ शकली नव्हती . शेवटी ओरिसा महापूर समिती कार्यरत असतांना डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करण्यात आली . वास्तविक महानदी खोऱ्याचा पाणीप्रश्न केवळ त्याच राज्याचा विषय होता पण विविध कारणांमुळे व मुख्यत्वे समन्वयाअभावी व गैरसमजूतीमुळे कुठलीच प्रगती होऊ शकली नव्हती . बाबासाहेबांनी महानदी खोऱ्याची पूर्ण माहिती घेऊन त्यांच्या शब्दात प्रतिपादन केले होते की विनंती केल्याप्रमाणे ” Taming of Mahanadi will be proceeded on the lines of DVC . ” खोलवर अभ्यास केल्यावर ओरिसा सरकारने नेमलेल्या कटक समित्या बरोबर बाबासाहेबांनी त्यांच्या सिंचन व वीज विभागाची मते मांडायचा प्रयत्न केला . महानदीत प्रचंड पाणी असून ती केवळ दुःखदायिनी आहे / प्रलंयकारी आहे असे तत्कालीन ओरिसा प्रशासनाची मतप्रणाली चूक असून पाण्याचा पुरेपूर उपयोग धरणे बांधून करावा असे त्यांनी खालीलप्रमाणे प्रतिपादन केले .. नव्हे डोळयात अंजन घातली .. ” With all respect to the members of these committees . I am sorryto say they did not bring the right approach to bear on the problem . They were Influenced by the Idea that water in excessive quantity is an evil , and what needs to be done is to let it run into the sea in an orderly flow . Both these views are now regarded as grave misconceptions , as positively dangerous from the point of view of the good of the people . .. त्याचबरोबर संबंधित कमिटीमधील निमंत्रित सल्लागार , जलनेते व तत्कालीन सरकार यंत्रणेस त्यांनी आग्रहाने सूचविले की तुम्ही महानदी खोऱ्यातील काही विशिष्ट त्रासदायक असणारे प्रश्न समोर मांडत आहात विनाकारण दुःखच व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही नदीखोऱ्यातील पाण्याचा पुरेपूर वापर धरणे बांधून करण्यासाठी का विचारणा करत नाही . त्यामुळे तुमच्या भागातील दारिद्रयहरण होईल , गरीबी हटेल आणि एकूणच जलविकास होऊन समृद्धी खेळू लागेल याविषयी बाबासाहेबांचा अनमोल सिंहावलोकन व सल्ला खालील प्रमाणे होता . ” Orissa wants to get rid of the evil of floods . Orissa wants to get rid of malaria and other to use American Phraseology – low income diseases causing ill health and corroding the stamina of her people . Orissa wants to raise the standard of living of her people and to advance her prosperity by irrigation , by navigation and by producing cheap electrical power . All these purposes can fortunately be achieved by one single plan , namely to build reservoirs and store the water which is flowing in its rivers . To say that water problem of Orissa was of flood is both over simplification and understatement of the problem … The people in Orissa are subject to many afffictions such as constant exposure of her people to flood , accompanied by draught and famine . Deterioration in health and of internal communication . But above all it is a problem of under development and high poverty … This is the case when it has substantial natural resources . Its precious possession is her water wealth .
बाबासाहेब केवळ सल्ले देऊन थांबले नाहीत . त्यांनी महानदी प्रकल्प साकार होत आहे याबाबतीत लक्ष घातले . तेथील सर्व ज्वलंत प्रश्न समजावून घेतले व ठीकठिकाणी मुख्य नदी / उपनद्यांवर धरणे बांधण्याचे प्रस्ताव मंजूर केले व एकूणच या जलसंपत्तीद्वारे पूरनियंत्रण , सिंचन जलवाहतूक , जलविद्युत निर्मिती , जलनिस्सारण , मासेमारी व इतर वापर कार्यक्षमतेने होणेस्तव हिराकुड नावाचा मोठा जलप्रकल्पही राबविला . व्हॉईसरॉयची परवानगी घेतली . प्रकल्पाद्वारे ८ लक्ष सिंचननिर्मिती व ५० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष पक्के केले . तत्कालीन CWINC चे अध्यक्ष इंजिनियर ए . एन . खोसला यांच्या सहकार्याने प्रकल्पाचे सर्वेक्षण / संकल्पन / बांधकामात सुरुवात केले . तत्कालीन गव्हर्नर Dr. Lewis हयांचे हस्ते स्वातंत्र्यपूर्व १ ९ ४६ मध्ये पायाभरणी करून हा प्रकल्प १ ९ ५७ मध्ये पूर्ण झाला . हा प्रकल्पही दामोदर प्रकल्पासह कार्यक्षमतेने राबविण्याचे श्रेय डॉ . बाबासाहेबांचेच होते हे विसरून चालणार नाही . तसेच तत्कालीन उत्तरप्रदेश , बिहार व मध्यप्रदेश ( रेवा प्रांत ) मधील सोन नदीवर ही आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचीही आखणी डॉ . आंबेडकरांनी केली . तद्नंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतभर जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या / मध्यम धरणाद्वारे देशातील जलविकासाचे चक्र वेगाने फिरू लागले हे आपण बघतच आहोत वीजनिर्मिती क्षेत्रामध्येही जलसिंचन क्षेत्राएवढीच प्रगती साधण्यात डॉ . आंबेडकरांचा फार मोठा सहभाग होता पण वेळेअभावी त्या विषयात मी हात घालत नाही ..
मित्रांनो , डॉ . आंबेडकरांचे भारतीय जलविश्वातील योगदानाविषयक थोडीफार माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे . त्यांच्या पाण्यासंदर्भातील कार्याविषयी अजूनही बरेचसे सांगता येईल . त्यांच्या जलक्षेत्रातील कार्याचा मागोसा पूर्णपणे घेता येणे खरोखरच कठीण आहे . कारण त्यांचे कार्यकाळातील उपलब्ध असलेली सरकारी / निमसरकारी कागदपत्रे / पत्रव्यवहार / संसदीय टिपण्या / मंत्रालयीन आदेश / ब्रिटिश सरकार व स्वतंत्र भारत सरकारातील त्यांचे श्रम , सिंचन व वीज विभागातील फाइल्स , त्यामधील जलक्षेत्राविषयक प्रभावीरित्या हाताळलेली प्रकरणे , भारतीय घटनेविषयक तत्कालिक काळातील कधीही न आटलेला पत्रव्यवहाराचा महापूर ई . साहित्यभंडाराचा आवाका प्रचंड मोठा आहे . त्यांचे विपुल लेखनसाहित्य भारतीय क्षेत्रातील सर्व उपांगाचा स्पर्श करतांना जलक्षेत्रातही अखंड संचार करते असे समजते . त्यांच्या जलक्षेत्रातील अमूल्य योगदानाविषयी लिहिणे हा एक संशोधनाचाच विषय आहे . त्यांच्या महानिर्वाणानंतर जवळपास चार दशकानंतर काही निवडक जलतज्ञ मंडळींनी / साहित्यिकांनी / अभियंतांनी व मुख्यत्वे मध्यवर्ती जल आयोगाने विद्यापीठाच्या सहकार्यातून बाबासाहेबांच्या १२५ व्या जन्मदिनी त्यांच्या जलक्षेत्रातील योगदानाविषयी लिखाण प्रस्तृत केलेले आढळून येते . ५-६ वर्षांपूर्वी केंद्रीय जलमंत्र्यांनी त्यांचा १४ एप्रिल जन्मदिन हा भारतीय जलदिन म्हणून पाळण्यात यावा अशी घोषणा केली होती .. पण बहुधा ती खाली सर्वांपर्यंत पोहोचली काय .. हे समजले नाही .. !
मित्रांनो , मागील सात दशकापासून आपण सर्व स्तरावरील अभियंते राष्ट्र उभारणीचे कार्य करीत आलेलो आहोत , जलक्षेत्रात आपण वेगाने विकास घडविला आहे . विविध नदीखोऱ्यातील जलसंपत्तीचा इष्टतम बहुउद्देशीय वापर करण्यासाठी धरणे , कालवे , वीजगृहे आपण अगणित जलमहामंडळे स्थापित करून करत आहोत . पण कुठेतरी या विकास पुरुषांची .. जल महर्षीची आठवण पुसट होऊ नये व शब्दरूपाने आपणाकडे पोहोचवावी आणि बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता या जागरातून काही अंशी करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे . परत एकदा व्यासपीठ , सर्व अभियंते , त्यांचे कुटुंबीय यांना अभिवादन करतो . आपल्या ज्येष्ठ / कनिष्ठ , स्वर्गस्थ अभियंत्यांचे स्मरण करून श्रद्धांजली वाहतो .. व माझे लांबलेल्या दोन शब्दास समाप्ती देतो .
नंदकुमार वडनेरे निवृत्त प्रधान सचिव ( जलसंपदा ) महाराष्ट्र राज्य
————————————————-
जाहिरात : वास्तुप्रसाद म्हणजेच वास्तुशास्त्रातील विश्वसनीय ब्रँड !
जाहिरात : Golden Eye मराठी OTT – Download App