राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा निकाल जाहीर !
पुण्याच्या नारायण पेठेतील संयुक्त 1प्रसाद मित्र मंडळास गणेश देखाव्याचे 51 हजाराचे प्रथम पारितोषिक !
गोल्डन आय न्यूज नेटवर्क :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019 चा निकाल 14 ऑगस्ट 2022 रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने ₹ 51000 चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
संयुक्त प्रसाद मित्रमंडळाने सादर केलेला देखावा “प्लास्टिकच्या खेळण्यांपासून बनवलेली श्रींची मूर्ती” या देखाव्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे म्हणाले की आमचे मंडळ हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असतात व त्यास गणेश भक्तांचा खूपच चांगला प्रतीसाद मिळत असतो.
अजित परांजपे यांनी सांगितले की त्यांच्या मंडळाने गेल्या अनेक वर्षात विविध प्रकारची पारितोषिके मिळवली असून मंडळ सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असून गेल्या 10 वर्षात मंडळातर्फे 250 पेक्षा जास्त सामाजिक सेवाकार्ये करण्यात आलेली आहेत.