आपल्या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….
गोल्डन आय न्यूज नेटवर्क :
माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना –
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत.
तसेच मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणाले की..
लक्षात घ्या माझ्या शेतकरी बांधवांनो , तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.
तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात.
शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की…
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….
आत्महत्या करू नका.
मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्यासोबत याची खात्री बाळगा.
जीव देणे बंद करूयात… जीव लावूयात एकमेकांना…