सेवा कार्य – संयुक्त प्रसाद मित्र मंडळ तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
पुण्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जय गणेश व्यासपीठ ने केलेल्या आवाहनानुसार नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळ व लायन्स क्लब ऑफ पुणे सनाराईज तर्फे दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या विषयी माहिती सांगतांना मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे म्हणाले की गेली 25 वर्ष मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे व ह्या वर्षी देखील शिबिरात महिला आणि नवयुवकांचा सहभाग लक्षणीय होता. एकूण 85 जणांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
यावेळी सह्याद्री हॉस्पिटल रक्तपेढीच्या नाईक मॅडम व डॉक्टर राव मॅडम यांनी हिमोग्लोबिन वाढी संदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय हेमंत जी रासने यांना लायन्स क्लब तर्फे स्मृती चिन्ह देण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे सनराइजचे अध्यक्ष सर्वश्री हरीश चौहान, प्रमोद संभूस, प्रदीप खोजे, रेवा औटी, जीवन माटे, क्षितिज धायरकर, सुवर्णा खोजे उपस्थित होते.
तसेच या वेळी उपस्थित नगरसेवक राजेश दादा येनपुरे यांचे सुंदर चित्र मंडळाच्या कार्यकर्त्या शुभांगी चव्हाण यांनी त्यांना भेट दिले.
नगरसेविका गायत्री ताई खडके यांच्या हस्ते सह्याद्री हॉस्पिटल रक्तपेढीच्या सुजाता नाईक व डॉ राव मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक श्री विनोद शेठ साखला यांचे विशेष सहकार्य मिळाले.