गोल्डन आय नेटवर्क : सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकरांच्या अस्मिता चित्र 𝐀𝐜𝐭𝐢𝐧𝐠 अकॅडमीचे विध्यार्थी नेहेमीच TV वरील विविध मालिके मध्ये दिसत असतात.
ह्या वेळेस स्टार प्रवाह वरील विविध मालिकेतील अकॅडमीचे 3 विध्यार्थी स्टार प्रवाह वरील गणेशच्या सोहळ्यात एकत्रित पणे काम करत आहे अशी माहिती सुलेखा तळवलकरांनी दिली.
अकॅडमीचे विध्यार्थी सुमेन दत्तात्रेय क्षीरसागर हा स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा मध्ये लहाण्या च्या भूमिकेत , आरूष गणेश बाणखेले हा मुरांबा मालिकेत पार्थ च्या भूमिकेत तर मैत्रेयी दाते ही रंग माझा वेगळा मलिकेमध्ये कार्तिकी च्या भूमिकेत काम करत आहे.
आता हे 3 विध्यार्थी एकत्रित पणे 𝗦𝘁𝗮𝗿 प्रवाह वरील गजर अष्टविनायकाचा – आज्जी सांगणार नातवांना श्री अष्टविनायकाची गोष्ट ह्या २८ ऑगस्ट दु. १२ वा. च्या कार्यक्रमात दिसणार आहे.
ह्या प्रसंगी बोलतांना अस्मिता चित्र Acting अकॅडमी च्या विश्वस्थ रंजनताई धराधर यांनी गोल्डन आय न्यूजचे संपादक प्रसाद शिवरकर यांना दिलेल्या मुलाखतीत अकॅडमी विषयी संपूर्ण माहिती दिली व कशा प्रकारे गेल्या 17 वर्षांपासून अकॅडमी मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन नाटक , सिनेमा व मालिका मध्ये काम मिळण्यास मदत करत आहे ह्या विषयी सांगितले.
ह्या प्रसंगी प्रसाद शिवरकरांनी विध्यार्थीचे विशेष कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.