भाजपा चित्रपट आघाडी तर्फे हर घर तिरंगा अभियान
गोल्डन आय नेटवर्क: भाजपा चित्रपट आघाडी तर्फे हर घर तिरंगा अभियान मोठ्या जोरात राबविले जात असून ह्या कामी संपूर्ण टीम कामाला लागली असल्याचे संपर्कप्रमुख अजय नाईक व जनसंपर्कप्रमुख कौस्तुभ दबडगे यांनी सांगितले.
ह्या प्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे खालील प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.
सस्नेह नमस्कार
आपण सर्व जाणताच की यंदाचा स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आणि विशेष आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान , आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी हर घर तिरंगा ची हाक दिली आणि अक्षरशः सर्व देश या अभियानाच्या कामाला लागला आहे, हा विषय राष्ट्रीय असून सर्वजण यात अगदी मन लाऊन काम करत आहेत आणि आपली चित्रपट कामगार आघाडी यात मागे राहीलच कशी !!
आपल्या आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि सभासद मंडळींना जाहीर आवाहन आहे की दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टच्या दरम्यान आपण आपापल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि शहरातील लोककलावंतांच्या, वरिष्ठ, निवृत्त कलाकारांच्या घरी भेटी देऊन त्यांना आघाडीतर्फे तिरंगा भेट द्यावा आणि त्यांच्यासोबत आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जोरदार साजरा करावा.!!
यातून आघाडीची त्यांच्याप्रतिची भावना आणि निष्ठा पोहोचवावी ही विनंती !!
धन्यवाद
जनसंपर्क विभाग
भाजपा चित्रपट कामगार आघाडी
महाराष्ट्र प्रदेश