कृतज्ञता सन्मान पुरस्कार 2022 – सौ रंजना सतीश धराधर
गोल्डन आय नेटवर्क : Golden Eye Productions , अस्मिता चित्र Acting अकॅडमी व वास्तुप्रसाद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात रंजना धराधर यांना ह्या वर्षीचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ह्या प्रसंगी जी ध्वनिफित ऐकवण्यात आली ती खालील प्रमाणे होती.
2004 सालापासून आपण नाट्यप्रशिक्षण क्षेत्रात अविरतपणे करत असलेल्या कार्याची नोंद घेऊन आपणांस कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यास आम्हांस अत्यंत आनंद होत आहे.
आपण 2004 साली लावलेले अस्मिता चित्र Acting अकॅडमी चे रोपटे आज एका महाकाय वृक्षात रूपांतरित झाले आहे.
आपल्या मार्गदर्शन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून आज अस्मिता चित्र Acting अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी नाटक , सिनेमा , टीव्ही मालिका , वेबसिरिझ व अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म वर यशस्वीरित्या काम करत आहेत व आपले करिअर घडवत आहेत.
आपले उच्च दर्जाचे संस्कार व प्रोत्साहन यामुळेच आपली कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकर चित्रपट क्षेत्रात यशस्वी झाली असून आपल्याबरोबरच अस्मिता चित्र Acting अकॅडमी चा कारभार पुढे नेत आहे.
आपल्या ह्या सत्कार्याची घोडदौड अशीच चालू राहून आपल्या हातून अनेक नवीन कलाकार निर्माण व्हावेत ह्या मनःपुर्वक शुभेच्छा !
आपण केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आपणांस हे सन्मान पत्र व पुरस्कार बहाल करण्यात आम्हांस अत्यंत आंनद होत आहे.
हा पुरस्कार माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते स्वीकारल्यावर आपले मनोगत व्यक्त करताना रंजना ताई म्हणाल्या की हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. पुरस्कारामुळे मला माझे काम करण्यास अजूनच प्रोत्साहन मिळाले असुन हे कार्य मी असेच अविरतपणे चालू ठेवेन.