वास्तुप्रसाद , सुलेखा तळवलकरांच्या अस्मिता चित्र Acting अकॅडमी व गोल्डन आय मराठी टिव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड शिवाजी नगर येथे 31 जुलै 2022 रोजी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
नाटक ही सर्व कलांना एकत्र आणणारी कला : सुहासिनी देशपांडे
गोल्डन आय न्यूज नेटवर्क : पूर्वी पुण्यात मेळे भरायचे, श्रावण आणि गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नाट्य क्षेत्राशी माझी ओळख झाली. नाटक ही सर्व कलांना एकत्र आणणारी कला आहे. नाट्य प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकास साधला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी केले.
गोल्डन आय प्रॉडक्शन, सुलेखा तळवलकरांच्या अस्मिता चित्र ॲक्टिंग ॲकॅडमी आणि वास्तुप्रसाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना नाट्यगौरव पुरस्कार सुहासिनी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आले. त्या वेळी देशपांडे बोलत होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू सांकृतिक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, गोल्डन आय प्रॉडक्शनचे संचालक प्रसाद शिवरकर, अस्मिता चित्र ॲक्टिंग ॲकॅडमीच्या विश्वस्त रंजना धराधर, कवयित्री हेमा लेले, आर जे राहुल म्हणजेच राहुल वाल्हेकर, निर्मात्या पायल मर्चंट, दिग्दर्शक सुधन्वा पानसे , डायरेक्टर सतीश धराधर , VFX एडिटर राहुल लोखंडे , अभिनय प्रशिक्षक अनुपम नवरे , भाजपा चित्रपट कामगार आघाडी संपर्क प्रमुख अजय नाईक , भाजपा चित्रपट कामगार आघाडी जनसंपर्क प्रमुख कौस्तुभ दबडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत प्रथम आलेल्या ‘अवघा रंग एक झाला’ या एकांकिकेचा प्रयोग या वेळी सादर करण्यात आला.
माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन पुढे नाट्य-चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले जाईल असे होत नाही. परंतु ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रात या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने सुहासिनी देशपांडे , रंजना धराधर , राहुल वाल्हेकर , आणि पायल मर्चंट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत प्रथम आलेल्या ‘अवघा रंग एक झाला’ या एकांकिकेला सांघिक विजेतेपदाचे पारितोषिक सुहासिनी देशपांडे, माधुरी सहस्त्रबुद्धे आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एकांकिका स्पर्धेतील अभिनय, दिग्दर्शन, संगीत संयोजन, प्रकाश योजना, नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत प्रसाद शिवरकर, रंजना धराधर, हेमा लेले , सतीश धराधर यांनी केले.
पुरस्कार प्राप्त झालेल्यांमध्ये खालील कलाकारांचा समावेश होता.
कार्यकारी मंडळातर्फे पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारांना गौरवपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
1) आरल सूर्यवंशी – उत्कृष्ट अभिनय
2) मेघना अडसूळ – उत्कृष्ट अभिनय
3) श्रेयस शिवरकर -उत्कृष्ट अभिनय
4) आराध्य सुर्यवंशी – उत्कृष्ट अभिनय
5) मैत्रेयी दाते – उत्कृष्ट अभिनय
6) आरुष बानखेळे – उत्कृष्ट अभिनय
7) नील किर्वे – उत्कृष्ट अभिनय
8) सोहम ढेकणे – उत्कृष्ट अभिनय
9) स्मरणी ढेकणे – उत्कृष्ट अभिनय
10) पावनी वाचकवडे – उत्कृष्ट अभिनय
11) पार्थ वाचकवडे – उत्कृष्ट अभिनय
12) स्वरा कौलगुड – उत्कृष्ट अभिनय
13) अनवी कुलकर्णी – उत्कृष्ट अभिनय
14) हरक भारतीय – उत्कृष्ट अभिनय
15) मार्तंड अष्टुळ – उत्कृष्ट अभिनय
16) चैतन्य कुलकर्णी – उत्कृष्ट अभिनय
17) स्वानंदी जाखडी – उत्कृष्ट अभिनय
18) जिनिता पांडे – उत्कृष्ट अभिनय
19) दिशा भोसले – उत्कृष्ट अभिनय
20) प्रचिती हासेगावकर – उत्कृष्ट अभिनय
21) सायली उघडे पाटील – उत्कृष्ट अभिनय
22) वृषाली पांडे – उत्कृष्ट अभिनय
23) प्रसाद शिवरकर – उत्कृष्ट अभिनय
काही विशेष पुरस्कार
24) डॉ अर्चना सामंत – विशेष अभिनय पुरस्कार. वय 75 वर्षे
25) रूपा शिवरकर – उत्कृष्ट प्रोड्युसर Golden Eye Productions Pvt Ltd
26) प्राजक्ता बिबवे – उत्कृष्ट पत्रकार CM News Chanel
27) निलेश बिबवे – उत्कृष्ट एडिटर CM News Channel
28) शुभंकर सातव – उत्कृष्ट Voice Over and Dubbing Artist – झी मराठी TV चे official Voice Over Artist .
29) श्रेया शिवरकर – उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट
30) सतीश धराधर सर – उत्कृष्ट क्रिएटिव्ह हेड
31) सुनील कदम – उत्कृष्ट संगीत संयोजन
32) अनाहिता कुलकर्णी – उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन
33) सुधनवा पानसे – उत्कृष्ट दिग्दर्शक
34) श्रुती कुलकर्णी – उत्कृष्ट दिग्दर्शक
35) वृषाल गुंजाळ – उत्कृष्ट Creative Head
36) हेमा ताई लेले – उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन – अवघा रंग एक झाला च्या लेखिका व दिग्दर्शिका
37) साक्षी किर्वे – उत्कृष्ट निवेदक
38) रंजनताई धराधर – अस्मिता चित्र Acting अकॅडमी च्या विश्वस्त रंजना ताई धराधर यांना ह्या वर्षीचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या प्रसंगी अस्मिता चित्र Acting अकॅडमी च्या विध्यार्थी व त्यांचे पालक यांनी देखील ह्या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेऊन मदत केल्याचे प्रसाद शिवरकरांनी सांगितले.
पालकांमध्ये मुख्यत्वे करून शामराव कुलकर्णी , दीपा कुलकर्णी , नुपूर कुलकर्णी , मृण्मयी कुलकर्णी , रूपा शिवरकर , श्रेया शिवरकर , श्रद्धा कुलकर्णी , पूनम वाचकवडे , साक्षी किर्वे , पपिता भोसले , आरती ढेकणे , काशिनाथ सूर्यवंशी , प्रसाद वाचकवडे , सचिन किर्वे , दक्षा जाखडी , महेश अष्टुळ , आरती अष्टुळ , रेखा अडसूळ , संतोष अडसूळ , आरती कौलगौड , नितीन कौलगौड , प्रतिमा हासेगावकर , श्रद्धा भारतीया , बालाजी सूर्यवंशी , इत्यादीनी कार्यक्रमात महत्वपूर्ण मदत केल्याचे प्रसाद शिवरकरांनी सांगितले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन साक्षी किर्वे यांनी केले.
प्रसाद शिवरकरांनी सर्व मान्यवरांचे , प्रेक्षकांचे , पाहुण्यांचे व पालकांचे आभार मानले.