गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे ३०
देव सेवेकडून मानव सेवेकडे
सेवा कार्य – २८ फेब्रुवारी २०२६
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने स्वा . सावरकर पुण्यतिथी निमित्ताने शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी धायरी, रायकर मळा येथील ज्ञान गंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे सेवा कार्य पार पडले. या अंतर्गत संस्थेला तीन महिने पुरेल इतका धान्य व किराणा साहित्याचा साठा भेट देण्यात आला.

समाजातील वंचित व विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या या निवासी विद्यालयात ५० पेक्षा अधिक मतिमंद मुले व मुलींचे संगोपन व पालनपोषण केले जाते. बहुतांश विद्यार्थी एकल पालक कुटुंबातील आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विक्रम कसबे यांनी यावेळी दिली. संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त करत गौरवोद्गार काढले.
मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित परांजपे यांनी मंडळाच्या मागील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या २५ पेक्षा अधिक सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व भविष्यातही अशा सेवा प्रकल्पांचे सातत्य राखण्याचा मानस व्यक्त केला. तसेच हे सेवा कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
तसेच या उपक्रमासाठी मदत केलेल्या उद्योजक श्री. विजय झगडे, अमेरिका स्थित रमणबागेचे माजी विद्यार्थी श्री. पराग ठकार तसेच निवृत्त बँक कर्मचारी श्री. माधव साने यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांचेही आभार मानले.
कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी अजित परांजपे, अमोल भालेराव, गुरुदत्त डिंगरे, दीपक उभे, संदीप उभे, कुणाल आहेर, गणेश पवार, प्रसन्न शिवरकर, सुनील मोहिते, अविनाश करंजावणे, बाल कार्यकर्ती कु. श्रेया भालेराव उत्स्फूर्त उपस्थित होते. सेवाभावी वृत्ती जपत समाजोपयोगी कार्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अजित परांजपे
अध्यक्ष
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
नारायण पेठ, पुणे ३०
📞9422332941
8007783268
9850651585











