गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्र. के. अत्रे जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी मधुकर भावे यांचा सत्कार !!
संवाद, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभातर्फे आयोजन !
पुणे : संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्र. के. अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सत्कार सोहळ्याचे व व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम मंगळवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
मधुकर भावे
भावे यांचा सत्कार माजी संरक्षण मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार असणार आहेत, अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन इटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सत्कार सोहळ्यानंतर मधुकर भावे यांचे प्र. के. अत्रे नाबाद 125 या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात