गोल्डन आय न्यूज नेटवर्क
“तेजस्विनी ” महिला लेझीम पथक
– नाद संस्कृतीचा !!
pune : पुण्यातील पहिल्या आणि एकमेव महिला लेझीम पथकाचा पहिला वर्धापन दिन शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी वडगाव शेरी येथे पारंपारीक पध्दतीने उत्साहात व जल्लोषात पार पडला.
या प्रसंगी पथकातील सर्व महिला वादक पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थित होत्या.
तसेच वर्षभरातील विविध कार्यक्रमांत झालेल्या सादरीकरणांमधे पथकातील काही उत्कृष्ट वादकांना तसेच विशेष योगदान देणाऱ्या सदस्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या वर्षीच्या गणेश उत्सवाचा सराव शुभारंभ यावेळी गणेश वंदना, लेझीम सादरीकरणाने करण्यात आला.
पुढील अनेक सादरीकरणां साठी आणि येणाऱ्या गणेश उत्सवातील वादना साठी तेजस्विनी महिला लेझीम पथकाला मनःपूर्वक शुभेच्छा!