गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत शुक्रवारी
स्टार्ट-अप कॉन्क्लेव आणि पुरस्कार वितरण !!
पुणे : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार से समृद्धी’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (दि. 2) स्टार्ट-अप कॉन्क्लेव आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सहकारिता धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे,
अशी माहिती सेंटर फॉर आंत्रप्रुनर्शिप डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत कदम, केअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अवधूत कदम यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात शिवनेरी हॉल, व्हॅम्निकॉम, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटन सत्र, परिसंवाद आणि पुरस्कार वितरण अशा तीन टप्प्यात कार्यक्रम होणार आहे. सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 1 वाजता होणार आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकारी संस्थांच्या अपर निबंधक ज्योती मेटे, व्हॅम्निकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, दूरदर्शनचे केंद्र प्रमुख बागल तसेच अवधूत कदम, प्रा. डॉ. प्रशांत कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्टार्ट-अप आणि सहकारी संस्थांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांशी जोडणे हा उद्देश आहे. यात राज्यातील 35 स्टार्ट-अप आणि 20 सहकारी संस्था सहभागी होणार आहेत. सहकारी संस्था उत्पादित वस्तूंची प्रदर्शनीही येथे भरविण्यात येणार आहे.
—————————————————————जाहिरात