गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन !!
स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावर शंकर तळघट्टी यांचे रविवारी व्याख्यान !!
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीतर्फे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदाचे 38वे वर्ष आहे.
स्पर्धा म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, दृकश्राव्य सभागृह, कर्वे पथ येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विलास उगले यांच्या हस्ते होणार आहे.
तर पारितोषिक वितरण रविवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शंकर रामचंद्र तळघट्टी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तळघट्टी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात