गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानित प्रतिभा मतकरी !!
प्रतिभा मतकरी
सन्मानाला उत्तर देतांना, प्रतिभा मतकरी यांनी सांगितले की, बालरंगभूमी ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. बालरंगभूमी यशस्वी होण्यासाठी मी सदोदित प्रयत्न केले. बालरंगभूमी परिषदेने माझ्या कार्याची दखल घेऊन, हा सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून आता बालरंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी खंबीर पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.