गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बालगंधर्व यांना अभिवादन !
नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे त्यांच्या बालपणी जळगाव येथील म्हाळस कुटुंबियांकडे वास्तव्य होते.
त्या म्हाळस कुटुंबियांच्या वतीने बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहातील बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते सुरेश साखवळकर, प्रशांत म्हाळस यांच्यासह बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत रवींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ ऑर्गन वादक संजय गोगटे उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात