Marathi FM Radio
Friday, June 6, 2025

ओम फाउंडेशनच्या चित्रशिल्प २०२५ प्रदर्शनास पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Subscribe Button

 

Advertisement

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

ओम फाउंडेशनच्या चित्रशिल्प २०२५ प्रदर्शनास.  पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

 

Advertisement

पुणे :ओम फाउंडेशनच्या आयोजित *चित्रशिल्प कलाकृती प्रदर्शन २०२५* चे उद्घाटन *२ जून रोजी बालगंधर्व कलादालन* येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे उद्घाटन *चित्रपट निर्माते संदीपजी मोहिते पाटील, डॉ. अजयजी दुधाने आणि श्री शिरीषजी मोहिते* यांच्या हस्ते संपन्न झाले.

Advertisement

Advertisement

या दोन दिवसीय प्रदर्शनात *४५ हून अधिक कलाकारांच्या ५०० पेक्षा जास्त सर्जनशील कलाकृतींचे* दर्शन विनामूल्य पुणेकर रसिकांना घडले.
गेली १६ वर्षे सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या ओम फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त*, *सुप्रसिद्ध अभिनेते श्री चेतन चावडा* यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सहभागी सर्व कलाकारांचा *सन्मानचिन्ह देऊन गौरव* करण्यात आला.

या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले *श्री संतोष चंदाने* यांचे *“शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची शस्त्रगाथा”* हे सजीव सादरीकरण, ज्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्यास *कला, समाजीक , पत्रकार, राजकीय , प्रशासकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर*,संस्थेच्या सल्लागार ॲड. मल्लिका वखारकर* तसेच पुणेकर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी *अध्यक्ष चित्रकर्ती चारु वखारकर यांनी सर्व उपस्थितांचे, सहभागी कलाकारांचे आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले .

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular