गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आडकर फौंडेशनचा ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार प्रा. मिलिंद जोशी यांना जाहीर !!
पुणे : आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
प्रा. मिलिंद जोशी
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित, गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ॲड. भास्करराव आव्हाड यांचा वाढदिवस आडकर फौंडेशनतर्फे गेली 29 वर्षे साजरा केला जात आहे. दि. 7 सप्टेंबर या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. भास्करराव आव्हाड यांच्याप्रमाणेच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने गौरविले जाते, असे आडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
_________________________________________
जाहिरात