गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सोनार महोत्सवात आत्माराम ढेकळे यांचा “स्नेह गौरव ” सन्मान!!
पुणे (प्रतिनिधीः- महाराष्ट्र स्वर्णकार संस्था व सुवर्णालंकार यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुर येथे आयोजित ‘भव्य सोनार महोत्सवात’ पुणे येथील पत्रकार आत्माराम ढेकळे यांचा अध्यात्मिक,सामाजिक ,वृत्तपत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या हस्ते व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत “स्नेह सन्मान “सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि सुवर्णालंकार मासिकाच्या तीन दशकांच्या यशस्वी वाटचाली निमित्त ३मे २०२६ रोजी नागपुरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात “सर्वशाखीय सोनार महोत्सव आणि ‘राज्यस्तरीय महिला मेळावा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले.या महोत्सवात सोनार समाजातील नगरसेवक,नगरसेविका,महापौर तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी ,समाजातील ज्येष्ठ व्यक्ती यांचाही सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये पुणे येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम ढेकळे यांच्या सामाजिक व वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा सुवर्णालंकारचे मुख्य संपादक प्रकाश माथने यांनी घेऊन संस्थेच्या व सुवर्णालंकार मासिकाच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.असे व्यासपीठावर कार्याचा गौरव करतांना व्यक्त केले.

व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या हस्ते ‘गौरव भेट ‘स्मृतीचिन्ह देऊन ‘स्नेह सन्मान ‘करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे महासचिव अनिल मालोकर हे उपस्थित होते.
व्यासपीठावर रोकडे ज्वेलर्सच्या संचालिका सौ.अनामिका रोकडे,महाराष्ट्र स्वर्णकार महिला समितीच्या अध्यक्षा सौ.वर्षा निनावे,शहर समितीचे उपाध्यक्ष संजय चिंचमलातुरे,रुग्वेद सुवर्णवार्ता प्रसार वाहिनीचे संपादक दिनेश येवले,श्रीराम उजैनकर (बुलडाणा),अशिष पोतदार(कोल्हापुर),अनुप तळणकर (नांदेड) आदींनी सत्कारमुर्ती आत्माराम ढेकळे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.











