Marathi FM Radio
Sunday, December 29, 2024

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात !!

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पुणे केंद्रात बाजी मारणाऱ्या म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‌‘बस नं. 1532‌’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीला आज (दि. 27) सुरुवात झाली.

Advertisement

महाअंतिम फेरीत पाच विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या एकांकिकेतील क्षण

Advertisement

सकाळच्या सत्रात म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणेच्या ‌‘बस नं. 1532‌’चे आणि न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (रंगवास्तू) यांचे सादरीकरण झाले.

Advertisement

दि. 28 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा)
सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त)
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान)

Advertisement

वेळ : सायंकाळी 4 वाजता
शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375)
आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1)
राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?)
सरस्वती भुवन आर्टस्‌‍ ॲण्ड कॉमर्स कॉलेज, छत्रपती संभाजीनगर (शहाजी)
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय)

दि. 29 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (फाटा)
म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा)
प्रादर्शिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन)
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी).

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org