Marathi FM Radio
Tuesday, June 30, 2026

नागपुर येथील वैश्य सुवर्णकार समाजाच्या वधु-वर परिचय मेळावा,ज्येष्ठांचा सत्कार कार्यक्रमात समाज बांधवाच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार. !!

Subscribe Button

 

Advertisement

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

नागपुर येथील वैश्य सुवर्णकार समाजाच्या वधु-वर परिचय मेळावा,ज्येष्ठांचा सत्कार कार्यक्रमात समाज बांधवाच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार. !!

पुणे  – महाराष्ट्र वैश्य संघ,नागपुर च्या वतीने “राॕयल माँ गंगा सेलीब्रेशन,पारडी ,नागपुर येथे ‘सामुहिक वर-वधु परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात समाज बांधवानी पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार केला.

Advertisement


महाराष्ट्र वैश्य संघ,नागपुर आयोजित दोन दिवसीय (१८व १९ जुन२०२६ )सामुहिक वर-वधु परिचय मेळावा,ज्येष्ठांचा सत्कार समारंभ आणि सामुहिक उपनयन संस्कार सोहळा या भव्य कार्यक्रमास मराठवाडा ,प.महाराष्ट्र येथील छत्रपती संभाजीनगर,बीड,पुणे ,सातारा,येवला(जि.नाशिक )येथुन वैश्य सुवर्णकार समाज संस्था/संघटनेचे पदाधिकारी,विश्वस्त,समाजबांधव उपस्थित होते.

Advertisement

बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बीड वैश्य सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेशनाना मेखे हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मान्यवरा सोबत उपस्थित होते.

Advertisement

प्रामुख्याने या सोहळ्यास वैश्य सुवर्णकार समाज अनंतसागर सेवा प्रतिष्ठान, छ.संभाजीनगर चे संस्थापक अध्यक्ष मनोहरराव कपाळे यांचे नेतृत्व मार्गदर्शनाखाली विश्वस्त पदाधिकारी अजय उर्फ घनशाम पावटेकर(येवला),वैश्य सुवर्णकार समाज येवला चे उपाध्यक्ष प्रदीपशेठ पावटेकर,,वैश्य सुवर्णकार समाज युवक मंडळ छ.संभाजीनगरचे अध्यक्ष संजय सराफ , उपाध्यक्ष संजय कपाळे ,सचिव वामनराव सराफ,सदस्य भगवानराव कानवे ,मंगेश ढेकळे ,वैश्य सुवर्णकार समाज,अकोला चे विजयराव सेलुकर,

बीडचे अरुणराव करमाळकर,संजयराव करमाळकर आदींनी व्यासपीठावर महाराष्ट्र वैश्य संघाचे अध्यक्ष अनिलजी वलोकार ,सचिव अजयजी वाऊ व पदाधिकारी तसेच इतर मान्यवर यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमास प्रभाकरराव साबनकर (पुणे),किशोर पावटेकर(येवलेकर)व रोहित देवगिरीकर (सातारा)तसेच भोकरदन ,सिंदखेडराजा आदी भागातील उपवर मुला -मुलींना घेऊन पालक या सोहळ्यास आले होते.या दोन दिवशीय कार्यक्रमात चहा ,अल्पोपहार,स्वादिष्ट भोजन तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

सदरील वैश्य सुवर्णकार समाजाचा हा सोहळा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन नागपुर येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठांचा सत्कार ,बटुंचा सामुहिक व्रतबंध सोहळा सामुहिक वर-वधु परिचय मेळावातसेच मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

प्रामुख्याने विविध प्रदेशातुन वैश्य सुवर्णकार समाज मोठ्या संख्येने या भव्य सोहळ्यास उपस्थित होता.आयोजकांचे विविध समितीच्या माध्यमातून उत्तम नियोजन याबाबत उपस्थित समाजबांधव ,पदाधिकारी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.असे वृत्तसंकलक आत्माराम ढेकळे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवितात.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular