गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. दीपक शिकारपूर यांच्या आयटी करिअरविषयक पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन !!
पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘अत्याधुनिक आयटी करिअर्स 2024++’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. डॉ. शिकारपूर यांचे माहिती तंत्रज्ञानविषयक 56वे पुस्तक आहे. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरलेल्या युवकांना करिअरविषयक मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 27 रोजी सकाळी 11:30 वाजता टाटा हॉल, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला असून पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, फिडेलसॉफ्ट जपानचे संस्थापक व अध्यक्ष सुनील कुलकर्णी विशेष निमंत्रित आहेत.
करिअर म्हणजे काय? येथपासून ते डिजिटल संस्कार एक अत्यावश्यक गोष्ट, उद्योजकता @ आयटी, संगणक क्रांतीमुळे बदलणारे रोजगार, क्लाउड कॉम्प्युटिंग, माहिती सुरक्षा, कृत्रिम बुद्धिबत्ता, जनरेटिव्ह एआय, ॲनालिटिक्स, चॅट बॉट एआय, अवकाश क्षेत्रातील संगणक तंत्रज्ञान, सायबर फॉरेन्सिक, यूट्यूबर, मेडिकल अशा विविध क्षेत्रात असलेल्या करिअर संधींविषयी वाटा या पुस्तकाद्वारे शोधता येणार आहेत.
नितीन प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.
———————————————————–
जाहिरात